Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आज आपन 2018 च्या अर्थसंकल्पा द्वारे डायरेक्ट टॅक्सेस मध्ये झालेले महत्वाचे प्रमुख बदल सविस्तर बघणार आहोत. त्या आधी वाचकांचे प्रश्नोत्तर जनहितार्थ देत आहोत.

 प्रश्न - एखाद्या शासकीय कर्मचारी 100% blind असेल तर त्याला IT मध्ये किती रुपया पर्यन्त सुट मिळेल ! व एखाद्याची पत्नी 100% blind असेल तर त्याला किती रुपये सूट मिळेल ? 
(खांडेराव हौसाजी कचवे, अहमद्पुर जि. लातूर) 
- 80% च्या वर डीसएबीलीटी आहे, म्हणून तुम्हाला 1,25,000/- रुपया पर्यन्त वजावट मिळेल. तुमच्या पत्नीसाठी सुद्धा हेच रुल लागु राहील. मात्र या साठी कायद्याच्या दिलेल्या अटी व सरटीफीकेट वगेरे ची पूर्तता करणे आवश्यक राहील 

 प्रश्न- पगारदारांना काय सवलत या वेळी देण्यात आली ?  
- या अर्थसंकल्पात झालेले डायरेक्ट टॅक्स मधील बदल संदर्भात सविस्तर बघत आहोत. सरकारच्या लक्षात आले की व्यापारी पेक्षा पगारदार हे जास्त टॅक्स भरतात. कर निर्धारण वर्ष 2016 -17 मध्ये 1.89 कोटी पगारदारांनी इन्कमटॅक्स रिटर्न भरले आणि 1.44 लाख कोटी टॅक्स भरले म्हण्जे सरासरी प्रत्यक पगारदाराने 76306/- रुपये टॅक्स भरले. याच वेळी याच वर्षात 1.88 कोटी इन्डीवीज्युअल व्यापाऱ्यांनी टॅक्स भरले. यात व्यावसायीकांचा समावेश आहे. हेच प्रमाणात 48000 कोटी रुपये भरले म्हण्जे सरासरी 25753/- वर इन्डीवीडयुअल भरले . सोप्या भाषेत याला असे म्हणता येइल की प्रत्येक पगारदाराने 76306/- रुपये भरले व व्यक्ती ने फक्त 25753/- रुपये भरले . पगारदार जास्त टॅक्स भरतात , हे पुन्हा एकदा प्रमाणित झाले . याच कारणामुळे पगारदारांना प्रमाणीत वजावट म्हणून 40000/- रुपये या अर्थसंकल्पात देण्यात आले . हे स्टॅंडर्ड डीडक्शन पेंशनरला ही देण्यात आले आहे . या मुळे 2.5 कोटी करदात्यांना याचा फायदा मिळणार आहे.

प्रश्न - या अर्थसंकल्पात वरिष्ठ नागरिकांना काय दिलासा देण्यात आला आहे? 
- बँकेच्या तथा पोस्ट ऑफिस च्या मिळणाऱ्या व्याजाची माफीची मर्यादा 10 हजार होती ती आता वाढवुन 50 हजार करण्यात अली आहे. 50 हजार रुपया पर्यन्त टी. डी. एस. सुद्धा कापले जाणार नाही. हा फायदा एफ. डी. च्या व्याजावर तथा आर. डी. म्हण्जे रिकरींग डीपॉजीट वर सुद्धा मिळेल.

वरिष्ठ नागरिकांना आतापर्यन्त 30 हजार रुपया पर्यन्त मेडीकल विमा वजावट मिळत होती ती आता वाढवुन 50 हजार करण्यात आली आहे. यालाच इन्कमटॅक्स च्या भाषेत असे म्हणता येईल की पूर्वी कलम 80 (डी) खाली ची 30 हजाराची वजावट मिळत होती ती आता 50 हजार करण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत चांगला आहे. वरिष्ठांना याची ही अत्यंत गरज होती. असेच वैधकीय खर्चाची वरिष्ठांची मर्यादा 60 हजार व 80 हजार होती ती आता 20 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आता वरिष्ठांना 80 तथा अतिवरिष्ठांना 1 लाख रु. झाली आहे. इन्कमटॅक्स चा भाषेत अस म्हणूया की कलम 80 डीडीबीची वजावट वाढवण्यात आली आहे.

शेवटचा मुद्दा संक्षिप्त मध्ये असा की दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10% टॅक्स लावण्यात आला आहे. व सेस 1% वाढवण्यात आला आहे. इन्कमटॅक्सची अधिक माहीती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.