Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

नेहेमीप्रमाणे सुरुवातीस वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न - आपले संद्यानंद वृत्तपत्रातील लेख वाचले पण काहीच अर्थ समजला नाही स्टॅण्डर्ड डीडक्शन म्हणजे काय?
(अजय श्रीकांत मांजरेकर, नवी मुंबई, कोपरखैरणे ) 
- स्टॅण्डर्ड डीडक्शन चे शाब्दीक अर्थ प्रमाणीत वजावट असे आहे. याचे आपण सोप्या भाषेत विवेचन बघुया. आपण बघीतले की पगारदार हे सरासरी मध्ये सर्वात जास्त इन्कमटॅक्स भरतात. करनिर्धारक वर्ष २०१६-१७ मध्ये प्रत्येक पगारदाराने सरासरी ७६३०६ /- रु भरले तथा इन्डीवीज्युअल किंवा व्यक्ती किंवा व्यापाऱ्याने सरासरी फक्त २५७५३ /- रुपये भरले पगारदारांना जास्तीचे टँक्सेशन होते हि चर्चा नेहेमीच करदात्यांमध्ये होत असते. पगारदारांना थोडी मदत व्हावी म्हणून हि वजावट देण्यात आली व यास प्रमाणीत वजावट असे नाव देण्यात आले. यालाच इंग्लिशमध्ये ' स्टॅण्डर्ड डीडक्शन ' असे संबोधीले गेले आहेत. हि वजावट पगारदारांना ४० हजार देण्यात आली आहे.

आता आपण इन्कमटॅक्स बद्दलची नवीन माहिती बघणार आहोत. आता मार्च एण्ड जवळ येत असुन प्रत्येक करदाता टॅक्स वाचवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे हे टॅक्स पगारदार असो की व्यापारी, टॅक्स कमी कसे करता येईल , या बद्दल आपण सोप्या भाषेतील प्रश्नोत्तर रूपात बघणार आहोत.

प्रश्न- इन्कमटॅक्स वाचवण्यासाठी बचतीचे काय काय पर्याय आहेत ?
- इन्कमटॅक्स वाचवण्यासाठी बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण प्रामुख्याने प्रश्नोत्तर रूपात सविस्तर रूपात एक- एक करून बघणार आहोत.

प्रश्न- कलम ८०( सी ) काय आहे ? 
- कलम ८० (सी) मध्ये बचतीचे अनेक पर्याय दिलेले आहेत की ज्याच्यात करदात्याने पैसे गुंतवले तर त्यांना इन्कमटॅक्स भरण्यापासुन काही प्रमाणात सुट मिळते

प्रश्न - या कलमाखाली जास्तीत जास्त तथा कमीतकमी किती रुपये करदात्यांना गुंतवणुक करता येते?
- या कलमाखाली करदात्यास जास्तीत जास्त १,५०,०००/- रुपये गुंतवता येतात .यात कमीची काही मर्यादा नसुन अधिकतम मर्यादा १,५०,०००/- पर्यन्त आहे.

प्रश्न- या कलमाखाली कोण-कोणत्या करदात्यास वजावट मिळते ?
- या कलमाखाली व्यक्ती ( म्हणजे इन्डीवीज्युअल ) आणि एच.यु.एफ याना वजावट मिळते. या कलमाची सविस्तर माहिती आपण पुढील लेखात बघणार आसुन प्रत्येक व्यक्तीने व्यवस्थित आदर्श नियोजन केल्यास कशा प्रकारे ७,३०,०००/- रुपयापर्यन्त एक चाणाक्ष व्यक्ती टॅक्स वाचवु शकते, हे ही पुढे बघणार आहोत.