Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आज आपण संक्षिप्त मध्ये अर्थसंकल्पात झालेले महत्वाचे बदल बघणार असुन त्या पूर्वी वाचकांचे प्रश्नोतर जनहितार्थ देत आहोत. प्रश्न - माझी पगार २.५ लाख पर महिना असुन माझे लागलेले टॅक्स वाचण्यासाठी मार्गदर्शन करा. (पारीमाला गांधी, मुंबई) 
- टॅक्स वाचवण्यासाठी अनेक पर्याय कायद्यात उपलब्ध आहेत परंतु त्या साठी सर्व माहिती देने आवश्यक आहे. उदा. फार्म १६ मधील एकूण उत्पन्न, एल. आय. सी., पी. पी. एफ. यातील गुंतवणुक, मेडीक्लेम असेल तर प्रीमीयम, डोनेशन इत्यादी. फक्त एका पगाराच्या अर्धवट माहितीवर टॅक्स काढता येत नाही.

२०१८ चे अर्थ संकल्प म्हणजे थोडी ख़ुशी थोडा गम

भारताचे अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांनी त्यांचे ५ वे व शेवटचे अर्थसंकल्प प्रस्तुत केले भारतीय अर्थव्यवस्था जगात ७ वी मोठी अर्थव्यवस्था आहे . यास थोडी ख़ुशी थोडा गम म्हंटल्यास वावगे ठरू नये. त्यांनी ७.५% अर्थव्यवस्थेवर वाढ दर्शवीली, जी बाब समाधान कारक आहे . या अर्थसंकल्पास थोडी ख़ुशी म्हणायचे कारण की हे अर्थसंकल्प शेतकरी प्रधान असल्याचे म्हण्टले तर वावगे ठरू नये. शेतमालाला डीढपट भाव , ए.पी . एम. सी चे निर्णय ईत्यादी बाबी फार चांगल्या आहेत मात्र याची अमलबजावणी कशी होते , या वर या योजनेचे यश अवलंबुन आहे . प्रधानमंत्री योजनेत ४ कोटी लोकांना मोफत वीज देणार , स्वच्छता मिशन योजनेत ६ कोटी शौचालय बांधले व २ कोटी बांधणार , २०२२ पर्यन्त ५१ लाख नवीन घरे बांधणार , १ लाख कोठी शिक्षणावर खर्च करणार या बाजु जमेच्या आहेत . कस्टमड्युटी कमी झल्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, दोन तीन दिवसात घरपोच पासपोर्ट मिळणार इत्यादी बाबी चांगल्या आहेत. आजचे गरीब ते अमीर, लहान मुलापासून ते वयस्करांचे सर्वांचे जीवन फार ताणतणावाचे झाले असुन त्यात हर्ट सर्जरी एकदम स्वस्त होणार हि बाब फार चांगली आहेत मेक इन इंडिया ची सुरुवात आहे असे मानायला वाव आहे. थोडा गम या साठी डायरेक्ट टॅक्स मध्ये मिनीमम स्लॅब मध्ये काहीच वाढ नाही. दरवर्षी ची वाढती महागाई बघता यात वाढ होणे आवश्यक होते किंबहुना ती लिमिट ४ लाख करणे गरजेचे होते. नोकरदारांना ४० हजाराचे स्टॅंडर्ड डीडक्शन देण्यात आले तथा वरिष्ठांना ५० हजार पर्यन्त टी. डी. एस लागणार नाही, हि बाब चांगली आहे. या अर्थसंकल्पात महिलांना काही नाही. वरिष्ठांना कलम ८ डी खाली ५० हजारापर्यंत विम्याची सुट देण्यात येणार आहे. हि बाब काळाची गरज होती, ती स्वागर्ताह आहे. एकंदरीत हे अर्थसंकल्प दीर्घकालीन आहे. १०% दीर्घकालीन भांडवली नफ्यावर टॅक्स लावले , हे चांगले नाही म्हणून थोडी ख़ुशी थोडा गम आहे.