Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स ६

आता पर्यन्त आपण कॅपीटल गेन्स टॅक्स बद्दल ची माहिती, त्याचे प्रकार, कोणती प्रॉपर्टी विकली तर टॅक्स लागतो, कॅपीटल असेट कसे ओळखावे, कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स, असे अशा अनेक बाबी बघीतल्या. आज आपण स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन, विक्री किंमत याचे नेमके फरक बघणार आहेत.

प्रश्न - कॅपीटल गेन साठी स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन (किंमत) म्हण्जे काय ?
- रजिस्ट्री कार्यालयामध्ये विकलेल्या प्रॉपर्टीची जी किंमत असते त्यास स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन असे म्हणतात.

प्रश्न - स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन, मार्केट किंमत, आणि विक्री किंमत या पैकी कुठल्या किमतीवर कॅपीटल गेन्स टॅक्स भरावे लागतो ?
- स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन म्हण्जे नोंदणी कार्यालयातील विक्री केलेल्या प्रॉपर्टीची किंमत असते. विक्री मूल्य म्हण्जे वास्तविक (रियल) विक्री किंमत आणि मार्केट व्हॅल्यु म्हण्जे सहसा स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन समजण्यात येते. या पैकी जी किंमत कॅपीटल गेन साठी धरली जाते.

प्रश्न - मीस्टर वाड्रा यांनी ५ कोटी रुपयाला प्रॉपर्टी विकली.परन्तु त्याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन २५ कोटी आहे.त्यांचे म्हणणे आहे की कॅपीटल गेनची मोजणी ५ कोटी वरच व्हायला पाहीजे कारण त्यांना तेवढेच पैसे मिळाले परन्तु ऑफीसर यांनी २५ कोटी धरून कॅपीटल गेन्स टॅक्स लावले. कोणाचे म्हणणे बरोबर आहे ?
- येथे वाड्राचे म्हणणे बरोबर नाही कारण आपण बघीतले की ऍक्च्युअल विक्री किंमत किंवा स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन या पैकी जे जास्त राहीला त्या वर कर आकारणी केली जाते. येथे कॅपीटल गेन्स टॅक्स २५ कोटी रु. धरून लावण्यात येइल.

प्रॉपर्टी विकून येणारा कॅपीटल गेन्स टॅक्स वाचु शकतो का, टॅक्स माफी कशी घ्यावी लागते, प्रॉपर्टी विकल्यानंतर माफी पूर्ण मिळते का आंशिक मिळते, नवीन राहणे घर विकत घेतल्यास माफी मिळते का ? घर बांधल्यास काय होते, अशा अनेक प्रश्नांचे उहापोह आपण पुढील आठवड्यापासुन बघायला सुरु करणार आहोत, जे वाचकांना व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरावी.