आपण सध्या कॅपीटल गेन बद्दल बघत आहोत. आता पर्यन्त आपण कॅपीटल गेन, कॅपीटल असेट, टॅक्स कधी लागतो, कशा प्रकारे कॅपीटल गेन टॅक्स लागतो, त्याचे प्रकार, ईत्यादी बाबत बघीतले. आज आपण त्या बद्दल अधिक माहिती बघणार आहोत. त्या पूर्वी वाचकांचे प्रश्न वाचकांच्या लाभासाठी देत आहोत.
प्रश्न - सर, कॅपीटल गेन बद्दल लेख वाचला खूपच छान माहिती दिली सर...Very Nice. गिफ्ट प्रापर्टी विकली तर किती टॅक्स व कोणत्या प्रकारे बसेल सोसायटी मध्ये प्लॉट आहे. 27 लाख पेमेण्ट मिळेल. सासऱ्याने प्लॉट नोटरी करून सात बारा माझ्या नावावर चढवुन प्लॉट अलॉट केला होता. टॅक्स सेव करायचे असेल तर काय करावे लागणार ? (प्रेमानंद पी. पेडणेकर, ताराबाई पार्क, नीलकमल अपार्टमेन्ट, कोल्हापूर).
- तुमची प्रापर्टी विकल्यामुळे कॅपीटल गेन्स टॅक्स लागेल. गिफ्टेड आलेल्या प्रापर्टी वर कॉस्ट ऑफ एक्वीझीशन काढण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. यात Cost to the previous owner म्हण्जे ज्यांनी तुम्हाला प्लॉट गीफ्ट दिला त्याची कॉस्ट धरली जाईल. याचाच सोप्या भाषेत अर्थ असा की तुमच्या सासऱ्याला जितक्यात प्लॉट पडला ती किंमत कॉस्ट ऑफ एक्वीझीशन होइल. यात टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय आहेत. यात एक साधा पर्याय म्हण्जे आपण कॅपीटल गेन बॉण्ड मध्ये पैसे गुंतवु शकतात. याची सविस्तर विस्ताराने माहिती आपण पुढे देणार आहोत. आज आपण प्रश्नोत्तर रूपात कॅपीटल गेनची चालू माहिती बघणार आहोत.
प्रश्न - दोन भावा मध्ये वडीलांची प्रापर्टी १४ कोटीला वारसाहक्काने आलेली विकली गेली. परन्तु MOU च्या आधारे एका भावाला दुसऱ्या भावाने ६ कोटी रु. दिले. इन्कमटॅक्स ऑफीसर याने त्या भावास १४ कोटीचा अर्धा हिस्सा म्हण्जे ७ कोटी रु. वर कॅपीटल गेन टॅक्स लावले. भावाचे म्हणने आहे की त्याला ६ कोटीवरच टॅक्स लावायला पाहीजे कारण त्याला ६ कोटीच मिळाले. भावाचे म्हणने बरोबर की इन्कमटॅक्स ऑफीसरचे ? - हे उदाहरण CIT v/s Ramankumar Suri यांचे असुन या प्रकरणात इन्कमटॅक्स ऑफीसर यानी ७ कोटी रु.ची विक्री धरली व ७ कोटी रु. वर भावाला टॅक्स लावले. हे वाद शेवटी हायकोर्टा पर्यन्त गेले आणि बॉम्बे हायकोर्ट यांनी निर्णय दिला की भावाच्या हिस्स्याला ७ कोटी रु. येत आहेत परन्तु MOU च्या आधारे दुसऱ्या भावाने त्यास फक्त ६ कोटी रु.च दिले आहे. पैसे न मिळताच अधिक पैशावर किंवा न मिळालेल्या पैशावर टॅक्स लावणे चुकीचे आहे. हायकोर्टने इन्कमटॅक्स ऑफीसरचे म्हणने फेटाळले व भावाला फक्त ६ कोटी वर टॅक्स लावण्याचे सांगुन भावाचे म्हणने मान्य केले. पुढील माहिती आपण पुढील आठवड्यात बघणार आहोत.