Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स २

आपण गेल्या आठवड्यात पाहिले की धंद्यातील नफ्याला ‘नफा’ म्हण्तो तर मालमतेतील नफ्याला कॅपीटल गेन म्हणतो. आज आपण कॅपीटल गेन बद्दलची अधिक माहिती सोप्या भाषेत बघणार आहोत, जी वाचकांना व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरावी.

प्रश्न - हिंदु अविभक्त कुटुंबातील पार्टीशन झालेल्या संपत्तीत कॅपीटल गेन्स टॅक्स लागेल का ?
- इन्कमटॅक्स कायद्यातील कलम 47 प्रमाणे हे ‘ट्रांसफर’ नाही म्हणून हिंदु अविभक्त कुटुंबातील पार्टीशन संपत्तीत कॅपीटल गेन्स टॅक्स भरावा लागणार नाही.

प्रश्न - राजाराम यांनी शिवराम या आपल्या मुलास ५ लाखाचे गीफ्ट दिले. राजाराम यांना कॅपीटल गेन्स टॅक्स भरावा लागेल का ?
- इन्कमटॅक्स कायद्यानुसार 'गीफ्ट' वर कॅपीटल गेन्स टॅक्स भरावा लागणार नाही.

प्रश्न - प्रापर्टी व्यवहारात झालेला नफा म्हण्जेच कॅपीटल गेन्स कसे काढतात ?
- इन्कमटॅक्सच्या कलम 48 प्रमाणे आलेल्या विक्री मूल्यातून खालील बाबी म्हण्जे खरेदी किंवा एक्वीझीशन मूल्य, लागलेला खर्च तथा विक्री खर्च कमी करावा तथा जो नफा राहील त्यास कॅपीटल गेन म्हणतात.

प्रश्न - मीस्टर गाला यांनी १० लाख रु. ला एक प्रापर्टी विकली. त्याची खरेदी किंमत ४ लाख होती. १ लाख रु. इम्प्रोवमेंट कॉस्ट तथा १ लाख रु. अन्य खर्च झाला आहे ? या व्यवहारात कॅपीटल गेन किती झाला ?- यात १० लाखाच्या विक्रीतून ४ लाख खरेदी, १ इम्प्रोवमेंट तथा १ अन्य खर्च वजा केले असता ४ लाख कॅपीटल गेन होइल.

प्रश्न - कॉस्ट इन्फ्लेक्शन इन्डेक्स म्हणजे काय ?
- कॉस्ट इन्फ्लेक्शन इन्डेक्स हा भारत सरकार द्वारा नोटीफाय केले जातात. आता पर्यन्त आर्थिक वर्ष 1981 हे वर्ष बेस इयर धरत आहोत परन्तु आता या बेस इयर ला बदलण्यात आले असुन आता 2001 हे वर्ष धरले जाणार आहे. याची अमलबजावणी १ एप्रिल २०१८ पासुन होणार आहे. प्रापर्टीचे खरेदी मुल्य यास बेस इयरची मदत घेउन इंडेक्सेशन काढले जाते व त्या प्रमाणात कॅपीटल गेन्स टॅक्स कमी केले जाते. सोप्या भाषेत असे म्हण्ता येइल की महागाई ज्या प्रमाणात वाढते, त्या प्रमाणात करदात्यांना त्यांच्या खरेदी किमतीवर वाढीचा फायदा दिला जातो. हे आपण पुढे सउदाहरण बघणार असुन त्या मुळे आणखी समजण्यात मदत होइल.