सध्या आपण कॅपीटल गेन्स टॅक्स बद्दल माहिती बघत आहोत. आज आपण कॅपीटल गेन्स किती प्रकारचे असतात. कॅपीटल असेट म्हण्जे काय ? प्रत्येक प्रापर्टीवर कॅपीटल गेन टॅक्स लागतो का ? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह सोप्या भाषेत बघणार आहोत, जे वाचकांना व्यवहारात उपयोगी ठरावे.
प्रश्न - कॅपीटल गेन किती प्रकारचे असतात. - कॅपीटल गेन दोन प्रकारचे असतात. लॉंग टर्म आणि शार्ट टर्म.
प्रश्न - कॅपीटल असेट किती प्रकारचे असतात. - कॅपीटल असेट पण दोन प्रकारचे असतात. लॉंग टर्म आणि शार्ट टर्म.
प्रश्न - कॅपीटल असेट आणि कॅपीटल गेन मध्ये काय फरक आहे ? - जी मालमत्ता विकली जाते ती जर कॅपीटल असेट असेल तर त्या विकलेल्या कॅपीटल असेट वरील नफ्यास कॅपीटल गेन असे म्हण्टले जाते.
प्रश्न - कोणती ही प्रापर्टी विकली तर कॅपीटल गेन्स टॅक्स लागतोच का ? - नाही. सर्वात आधी विकलेली मालमत्ता ही कॅपीटल असेट आहेत की नाही, हे बघायचे असते. जर विकलेली मालमत्ता कॅपीटल असेट असेल तर त्या वरील नफ्यास कॅपीटल गेन टॅक्स लागेल.
प्रश्न - अमुख मालमत्ता ही कॅपीटल असेट आहे की नाही, हे कसे ओळखावे. - मालमत्ता कॅपीटल असेट आहे की नाही, हे ओळखण्यासाठी इन्कमटॅक्स कायद्यात कॅपीटल असेटची परिभाषा तथा माहिती दिलेली आहे, त्या वरून ओळखावे लागते.
प्रश्न - संभाजीराव यांनी शेतीची जमीन विकली आहे ? संभाजीराव यांना कॅपीटल गेन्स टॅक्स भरावे लागेल का ? - शेती ही इन्कमटॅक्स मध्ये कॅपीटल असेट नाही म्हणून शेती विकल्यास ढोबळ मानाने कॅपीटल गेन टॅक्स लागत नाही. कोणत्या विकलेल्या शेतीस कॅपीटल गेन्स टॅक्स लागतो, हे पुढे आपण बघणार आहोत.
प्रश्न - आपण बघीतले की दोन टाइप चे कॅपीटल गेन असतात त्यात लॉंग टर्म कॅपीटल गेन म्हण्जे नेमके काय ? - या वर्षी दाखल करणाऱ्या म्हण्जे आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी लॉंग टर्म कॅपीटल गेन म्हण्जे जी मालमत्ता (कॅपीटल असेट) ३६ महिने किंवा त्यापेक्षा जास्त होल्ड केल्यानंतर विकली जाते, त्या नफ्यास लॉंग टर्म कॅपीटल गेन म्हण्टले जाते. हे आपण उदाहरणासह पुढे बघणार आहोत, ज्यामुळे समजण्यास सोपे होईल.
प्रश्न - शार्ट टर्म कॅपीटल गेन म्हण्जे काय ? -विकलेली प्रापर्टी (मालमत्ता) जर ३६ महिने पेक्षा कमी काळात होल्ड करून विकली असेल तर त्यास शार्ट टर्म कॅपीटल असेट म्हणतात व त्या वरील येणाऱ्या नफ्यास शार्ट टर्म कॅपीटल गेन असे म्हण्टले जाते.
प्रश्न - मिस्टर लंबूराव यांनी दहा वर्षा नंतर एक मालमत्ता विकली तथा छोटूराव यांनी २ वर्षानंतर मालमत्ता विकली. कोणती प्रापर्टी वर कोणता टॅक्स लागतो ?
- जी मालमत्ता ३६ महिन्यापेक्षा जास्त ठेउन विकली त्यास लॉंग टर्म कॅपीटल गेन लागेल व बाकीस शार्ट टर्म. म्हण्जेच मिस्टर लंबूराव यांना लॉंग टर्म कॅपीटल गेन तथा छोटूराव यांना शार्ट टर्म कॅपीटल गेन लागेल.
प्रश्न - लॉंग टर्म कॅपीटल गेन तथा शार्ट टर्म कॅपीटल गेन यांना मराठीत काय म्हणतात ?
- लॉंग टर्म कॅपीटल गेन यास दीर्घकालीन भांडवली नफा तथा शार्ट टर्म कॅपीटल गेन यास अल्पकालीन भांडवली नफा असे संबोधले जाते. इन्कमटॅक्स ची कॅपीटल गेनची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.