Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सर्वात आधी वाचकांचे प्रश्नोत्तर जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न - सर, नमस्ते मी आपले लेखन नेहमी वाचतो. मी ३ महिन्यापूर्वी पोलीस मधुन निवृत्त झालो आहे मला अजुन पेंशन लागु झालेली नाही पण मला जीपीएफ चे ९५२१०१/- व ग्रॅज्युएटी ३७५२७५/- एवढी रकम मिळाली आहे तरी ही रकम टॅक्सेबल आहे अगर कसे ? व रक्म कोणत्या फंडात गुंतवणुक करावी कृपया सल्ला मिळावा ही विनंती . 
(विजय शिरोडकर , कल्याण (प.) )
- तुम्हाला जीपीएफ आणि ग्रॅज्युएटी च्या मिळालेल्या रकमेवर इन्कमटॅक्स लागणार नाही. गुंतवणुक कुठे करावी त्या साठी आपण नियमित सदर पेपर मधील लेख वाचत रहावे तसेच जुने अंक चाळावे म्हणजे बरीच माहिती तुम्हाला मिळू शकेल.

आपण गेल्या आठवड्यापासून दहा हजारापेक्षा जास्त रोख खर्च केल्यास वजावट मिळणार नाही या बद्दल बघत आहोत.

आज आपण याच विषयावर प्रश्नोत्तर रुपी सोप्या भाषेत अधिक माहिती बघणार आहोत

प्रश्न - दहा हजार रुपये हे एका दिवसासाठी आहे कि एका व्यवहार साठी आहे ? 
- १०००० ची मर्यादा एका दिवसाची आहे.

प्रश्न - समजा करदात्यांनी एकाच माणसाकडून परंतु एकाच दिवसात ३-३ तासाच्या फरकातून चार -चार हजार रुपयाची खरेदी केली तर सुट मिळेल का ? या प्रश्नात त्याने वेगवेगळे बीलहि रोखी चे घेतले आहे ?
- वरील प्रश्नात दर ३ तासाच्या फरकात ४-४ हजाराची ३ दा खरेदी केली म्हणजे १२ हजाराची खरेदी केली. याचाच अर्थ असा की १ दिवसात १२ हजाराची रोखीने खरेदी झाली. या मुळे करदात्यास इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळणार नाही कारण की त्याने एका दिवसात १० हजारापेक्षा जास्तीची खरेदी केली. त्याच्या जवळ वेगवेगळे जरी बील असले तरी त्यास वजावट मिळणार नाही , हे विशेष.

प्रश्न - करदात्याकडे एका पदार्थाची एजन्सी आहे. त्याने विक्री करणाऱ्याच्या खात्यात रोख रक्कम डायरेक्ट अकाउंट मध्ये भरली त्याने विक्रेत्याच्या खात्यास रोख रक्कम भरल्यामुळे त्याची वजावट इन्कमटॅक्स मध्ये मिळणार की नाही ? 
- एजंटने रोख रकम डायरेक्ट विक्रेत्याच्या खात्यात भरले याचाच अर्थ असा की या व्यवहाराबद्दल कुठेच साशंकता नाही . हा व्यवहार निव्वळ व्यापाराचा धरला जाईल . येथे दोन नंबरचा प्रश्न उदभवत नाही या मुळे करदात्यास इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळेल. अशाच प्रकारचा निर्णय पंजाब ऍण्ड हरियाना कोर्ट ने कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स विरुद्ध श्रीमती शेली पासी या केस मध्ये दिले आहे. इन्कमटॅक्सची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत वाचकांनी आपले प्रश्न वाटसअप वर मराठीत विचारावे ही विनंती.