Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सध्या आपण गेल्या दोन आठवडयापासून दहा हजार रु. पेक्षा जास्तीची रोखीने खरेदी करता येत नाही, या विषयावर बघत आहोत. आतापर्यंत आपण बघितले की जर जास्तीची खरेदी रोखीने केल्यास काय परिणाम होतील. स्टॉक हे खरेदी मध्ये धरले जाईल की नाही, हे ही बघितले.

आज आपण त्याचीच अधिक माहिती बघणार असुन त्या पूर्वी नेहमी प्रमाणे वाचकाचे प्रश्नोत्तर जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न – नमस्कार सर मी सुरत येथे एका नामांकीत कंपनीत काम करतो काही वैयक्तिक कारणास्तव मी रजेवर असल्याने ठराविक वेळेत होम लोन रिपेमेन्टचे डाक्युमेन्टस सादर करू शकलो नाही. यामुळे माझ्या पगारातून अधिक टीडीएस कापला गेला. माझ्या माहितीनुसार फॉर्म १६ मधेही माझी गुंतवणुक दिसणार नाही. प्रश्न असा आहे की माझ्याकडे लोन रिपेमेन्ट सर्टिफिकेट आहे. मी टॅक्स रिफण्ड क्लेम करू शकतो का? कसे? धन्यवाद- अभिषेक, औरंगाबाद ( हल्ली मुकाम सुरत ) 
- तुम्ही रिटर्न फाईल करतांना अधिक कापलेले टीडीएस रिफण्ड मागु शकता. फॉर्म १६ मध्ये न दाखवलेली गुंतवणुक ही तुम्ही रिटर्न फाईल करतांना दाखवावी म्हणजे तुम्हाला वजावट मिळेल.

प्रश्न – मालाची खरेदी करतांना सुध्दा हा दहा हजाराचा कायदा लागू आहे का ? 
- होय, मालाची खरेदीसाठी सुध्दा दहा हजाराचा कायदा लागू आहे. वरील प्रकारचा निर्णय श्रीमती चंचला डोंगरा विरुध्द इन्कमटॅक्स ऑफीसर या केसमध्ये पंजाब एण्ड हरियाना या उच्च न्यायालयाने दिला आहे.

प्रश्न – जर एखादा खर्च अकाऊंट पेई चेकने न देता क्रॉस चेक दिला तर खर्चाची वजावट नाकारली जाऊ शकते का ? 
- गुजरात हायकोर्ट यांनी राजमोती इंडस्ट्रीज वि. स. कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स या केस मध्ये क्रॉस चेकने दिलेल्या खर्चास वजावटीस पात्र न धरता नाकारले आहे. याचा अर्थ असा की जर खर्चाचे पेमेन्ट अकाऊंट पेई चेकने नाही दिलेवर त्या खर्चास इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळणार नाही.

आपण पुढच्या वेळेस या दहा हजाराच्या मर्यादेला काही अपवाद आहे का ? आहेत तर कोण कोणते ? त्याची सविस्तर माहिती एक एक करून बघणार आहोत जे व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरावे.