Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आज आपण दहा हजाराच्या खर्चाच्या नियमासाठी काही अपवाद आहेत का ? जर असेल तर ते काय आहेत या वर चर्चा करणार आहोत. त्या आधी वाचकांचे प्रश्नोत्तर जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न – दहा हजाराच्या खर्चाची तरतूद लागू नये या साठी काही अपवाद आहे का ? असेल तर कोणते आहेत ? - होय, या साठी अपवाद आहेत.

ते खालील प्रमाणे

१) जर पेमेन्ट बँकेला किंवा रिझर्व बँकेला किंवा अशी बँक जी बँकिंग रेग्युलेशन एक्ट १९४९ खाली असेल आणि पेमेन्ट त्यांना दिले तर वरील दहा हजाराचा कायदा लागू होणार नाही.

२) जर पेमेन्ट स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा त्यांच्या साहाय्य सबसिडीअरी कंपनीला (जुने व्याखे प्रमाणे) केले असेल तर

३) कुठल्याही को-ऑपरीटीव बँकेला किंवा लॅन्ड मॉर्टगेज बँकेला केले तरीही वरील दहा हजाराचा कायदा लागू होणार नाही.

४) कुठली ही प्रायमरी अग्रीकल्चरल सोसायटीला पेमेन्ट केले असल्यास ते ही चालेल त्याला ही हा दहा हजाराचा कायदा लागू नाही.

५) एल.आय.सी. चा हप्ता किंवा एल.आय.सी. ला पेमेन्ट केल्यास त्यास हा कायदा लागू होत नाही.

६) जेथे सरकारला पेमेन्ट केले असल्यास तेथे दहा हजाराचा कायदा लागू होत नाही.

७) जेथे पेमेन्ट लेटर ऑफ क्रेडीट व्दारे पेमेन्ट केले असल्यास तेथे हा कायदा लागू होत नाही.

८) बँकेच्या मेल किंवा टेलीग्राफिक ट्रान्सफर व्दारे पेमेन्ट दिल्यास हा कायदा लागू होत नाही.

९) बँकेच्या बुकएन्ट्रीला हा कायदा लागू होत नाही.

१०) बिल ऑफ एक्सचेंज जर हे पेमेन्ट फक्त बँकेला होत असेल तर

११) आर.टी.जी.एस. किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर

१२) डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड

१३) कुठल्या एखाद्या धनको किंवा ऋणको च्या कर्जाची किंवा मालाची एडजस्टमेन्ट असेल तर ते कायद्यात मोडणार नाही.

१४) जर पेमेन्ट एखाद्या शेती संबंधित किंवा फॉरेस्ट संबंधी असेल तर हा कायदा लागू नाही.

१५) जनावरे म्हणजे एनिमल हसबक्डरी संबंधी किंवा डेअरी संबंधी असेल तर हा कायदा लागू होणार नाही.

१६) फिश (माशी) किंवा फिश उद्योगाला हा कायदा लागू नाही.

१७) हॉट्रीकल्चर (फळबाग) संबंधी त्यास हा कायदा लागू नाही.

१८) कॉटेज इंडस्ट्री जेथे पावर उपयोगी घेत नाही अशी इंडस्ट्रीला कायदा नाही.

१९) असे खेडे जेथे बँकच नाही.

२०) कर्मचाऱ्यास विशिष्ट परिस्थितीत ५० हजारापर्यंतचे पेमेन्टला हा कायदा लागू नाही.

२१) जहाजाचा टेम्पररी कर्मचारी जर १५ दिवसापेक्षा जास्त शिपमध्ये नोकरी वर जात असेल तर त्याला पगार रोखीत दिले तर चालते.

२२) पेमेन्ट अशा दिवशी दिले ज्या दिवशी बँक बंद आहे किंवा स्ट्राईक आहे, तर हा कायदा शिथील होईल.

२३) एजंटाने मालकाच्या वतीने पेमेन्ट केल्यास एजंटचे दोष धरले जाणार नाही.

२४) अधिकृत डीलर किंवा पैशाची देवाण घेवाण करणारा नामी एक्स्चेंजर कायद्यानुसार पैशाची देवाण घेवाण रोखमध्ये करत असेल तर हा कायदा लागू होणार नाही.


आपण संक्षिप्त मध्ये हा विषय गेल्या तीन आठवड्यापासुन बघत आहोत. आता पुढील आठवड्यापासून इन्कमटॅक्सची नवीन माहिती बघणार आहोत.