Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स


सर्वात आधी वाचकांचे प्रश्न नेहमीप्रमाणे जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न -  मी ऑफीस मधुन लोन घेऊन 1 बी. एच. के. फ्लॅट घेतला होता. लोन फेडुन झाले आहे. आता मला 2 बी. एच. के. फ्लॅट लोन घेऊन विकत घ्यायचा आहे. तर मला इन्कमटॅक्स मध्ये सुट कशी मिळणार, सांगावे. ( अजयकुमार ढेपे, 59/ 101, रीवर वूड पार्क, कल्याण शील रोड, खीडकली, डोंबिवली (पूर्व) थाना ) 
 - तुम्हाला दुसरा घर लोनवर घ्यायचा आहे. तरी तुम्हाला नेहमीप्रमाणे इन्कमटॅक्स कायद्याच्या कलम 80 (सी) खाली 1 लाख 50 हजार पर्यन्त लोन चे हप्त्याची वजावट रीतसर मिळु शकते. आज चा रविवार या 2017- 2018 आर्थिक वर्षातील शेवटचा रविवार आहे. मार्च एंडींग चा शेवटचा काही दिवस हातात असल्यामुळे सर्व करदात्यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे व्यापाऱ्यांनी व नोकर वर्गांनी विशेष लक्ष दिल्यास वर्ष भरातील पेंडिंग काम उरकणे आहे. ज्या करदात्यांनी आता पर्यन्त व्यवस्थित लक्ष दिले नाही परंतु शेवटच्या आठवड्यावर कुठे लक्ष द्यावे की ज्या मुळे इन्कमटॅक्स चा त्रास कमी होईल हे आपण संक्षिप्त मध्ये बघणार आहोत.

मार्च एण्ड साठी लक्षात ठेवायच्या महत्वाच्या काही बाबी.

कॅश -
- अनेक करदात्यांची 31 मार्च रोजी अवाढव्य कॅश असते. ज्या करदात्यांचा धंदा फार मोठा आहे, ज्यांची कॅश रेग्युलर असते त्यांची गोष्ट वेगळी. बाकी सहसा हे लक्षात ठेवावे की अती कॅश एकाच दिवशी असने आणि ती ही मार्च एन्डींग ला असणे म्हणजे शंका घेण्यास कारण ठरू शकते. ही बँक शिलकी मध्ये न दाखवता बँकेत जमा केल्यास योग्य ठरू शकते.

क्लोजींग स्टॉक -
- आपले दुकानाचे स्टॉक आपल्या वह्या पुस्तका प्रमाणे टॅली आहे की नाही, हे फार महत्वाचे आहे. अनेकदा कट ऑफ ट्रॉन्जेक्शन मुळे ही फरक पडू शकतो, तोही बघावा. अनेकदा आपण माल विक्रीसाठी मागवतो. परन्तु त्याचे बील मार्च एण्ड पर्यन्त आलेले नसते किंवा अनेकदा बील येऊन जाते परन्तु माल दुकानात आलेला नसतो, अशा व्यवहार लक्ष देऊन हाताळावे, म्हणजे पुढे अडचण येत नाही.-

धनको तथा ऋणको - 
- डेटर्स आणि क्रेडीटर्स कडे लक्ष देणे पण महत्वाचे आहे. 31 मार्च 2018 रोजी चे त्यांचे बॅलेन्स टॅली होणे महत्वाचे आहे. जर या दोन पार्टीच्या आपसातील खात्यात फरक येत असल्यास हे अकाउंट शंकास्पद ठरते.

खर्च- अनेक खर्चाच्या बाबी यांचा तपशील मार्च नंतर मीळतो परंतु त्याची तडजोड करुण ठेवणे आवश्यक असते.

नफा नुकसान खाते -
- नफा नुकसान खात्यातल्या सर्व बाबीवर तसेच बॅलेन्स शीटच्या सर्व बाबीवर एक नजर टाकून अंदाजी नफा तोटा अकाउंट किंवा टेन्टेटीव बॅलेन्सशीट ही 31 मार्च 2018 रोजी काढुन ठेवल्यास इन्कमटॅक्स रिटर्न भरते वेळी अडचण येणार नाही. वरील बाबी चे लक्ष दिल्यास करदात्यास इन्कमटॅक्स चा शेवटचा गोंधळ कमी होईल. टॅक्स प्लानींग ला ही मदत होईल. इन्कमटॅक्स ची अधिक माहिती आपण पुढील आठवड्यात बघणार आहोत.