नेहमीप्रमाणे सर्वात आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत :-
प्रश्न - मी या पेपर मध्ये तुमचे इन्कमटॅक्स चे लेख वाचले. फार छान वाटले. मला हे विचारायचे आहे कि कलम ८० सी आणि १० डी पासुन होणारे फायदे सांगावेत ? तसेच इन्शुरन्स चा टॅक्स सेव्हिंग मध्ये कसा वापर होतो, सांगा ?
( शान्तिकुमार बी. लाठे , इचलकरंजी , ग्राम शीरोधन)
- आपण सद्या काही आठवड्यापासून कलम ८० सी बद्दलच बघत आहोत. ते जुने अंक आपण वाचावे. कलम १० डी बद्दल आपण सविस्तर पुढे बघणार आहोत. सद्या सारांश म्हणून इतके सांगता येईल कि एल. आय. सी. चे मॅच्युरिटी वगैरे मध्ये मिळणाऱ्या पैशावर इन्कमटॅक्स लागत नाही हे महत्वाचे.
- आज आपण एक छोटासा पण महत्वाचा विषय बघणार आहोत की चांगली टॅक्स प्लॅनिंग केल्यास एक चाणाक्ष गुंतवणूकदार वेगवेगळ्या कलमाच्या वजावटी द्वारे जवळ जवळ ७ लाखाच्या उत्पन्नाच्या वर पर्यन्त टॅक्स लागू देत नाही. हीच मर्यादा वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नागरिकांना अजून जास्त मिळते.
- कलम ८० सी खाली व कलम ८० सी सी इ खाली एल. आय. सी., पी पी एफ इत्यादी खाली जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपयापर्यन्त गुंतवणूक करता येईल.
कलम ८० डी खाली मेडिकल इन्शुरन्स साठी चालू वर्षासाठी ( आर्थिक वर्ष ) २५ हजार रुपया पर्यन्त प्रीमियम भरता येईल. हीच मर्यादा वरिष्ठ नागरिकांसाठी ज्यांचे वय ६५ वर्ष आहे त्यांना ३० हजारा पर्यन्त आहे. हेल्थ चेकअप साठी ५ हजार रुपयापर्यन्त वेगळी सूट मिळू शकते .
कलम ८० सीसीडी १ (बी) या कलमाखाली अतिरिक्त ५० हजार रु पर्यन्त वजावट मिळू शकेल.
- स्वतःच्या राहत्याघरासाठी घेतलेल्या कर्जावर २ लाख रु पर्यन्त चे व्याज वजावटीस पात्र आहे. तसेच रिपेरिंग साठी व्याजाची मर्यादा ३० हजार आहे कलम ८० ए पासुन ८० यु पर्यन्त च्या सर्व वजावटी घेऊ शकता . दान देऊन सुद्धा टॅक्स वजावट मिळू शकते त्याला काही अटीची पूर्तता हि करावी लागेल. स्वतःच्या किंवा जीवन साथीच्या किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊन हि व्याजाची वजावट मिळू शकते.
इन्कमटॅक्स ची अधिक माहिती पुढील हप्त्यात बघणार आहोत.