Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सध्या आपण कलम 80 सी बद्दल बघत आहोत. आता पर्यन्त आपण छोट्या अशा गुंतवणुकीच्या 24 बाबी बघीतल्या. आज आपण त्या पुढील माहिती बघणार आहोत. त्या आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत. 

प्रश्न- कलम 80 (सी) च्या व्यतिरिक्त अजुन दुसऱ्या कलमाखाली टॅक्स वाचवण्यासाठी मी कुठे गुंतवणूक करू ? (विजयन, नालासोपारा, मुंबई) 
- सध्या आपण 80 (सी) बघत आहोत. त्या नंतर क्रमशः इतर कलमाखालचे हि गुंतवणुकीचे पर्याय एक- एक करून बघणार आहोत. आपण सदर दैनिक नियमीत वाचावे, म्हणजे लक्षात येईल. 

25) जेथे पेमेन्ट फायनान्सींगचे हप्ते राहत्या घराच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी असेल त्या हप्त्याची रकम वजावटीस पात्र आहे. 

26) कोऑपरेटीव सोसायटीचे राहत्या घराचे बांधकामाचे किंवा खरेदीचे हप्ते वजावटीस पात्र आहे. 

27) राहत्या घरासाठी भारत सरकार किंवा राज्य सरकार कडुन घेतलेल्या कर्जाचे हप्ते. 

28) राहत्या घरासाठी कोणत्याही बँके कडुन घेतलेले कर्जाचे हप्ते 

29) राहत्या घरासाठी एल. आय. सी. कडुन घेतलेले कर्जाचे हप्ते. 

30) राहत्या घरासाठी नॅशनल हाउसींग बँके कडुन घेतलेल्या कर्जाचे परतफेडी चे हप्ते. 

 31) तसेच वरील प्रमाणे पब्लीक लीमीटेड कम्पनी कडुन घेतलेल्या कर्जाची परतफेड.

32) कोऑपरेटीव सोसायटी जी घर बांधकामासाठी बनवली असुन त्याचे कर्जाचे परतफेडी चे हप्ते.

33) करदात्याचे मालक जे केंद्रिय किंवा राज्य सरकार द्वारा निर्मित असुन अशा बॉडी कडुन घेतलेल्या राहत्याघराचे हप्ते ची परतफेड वजावटीस पात्र आहे. 

 34) करदात्याचे वरील उद्देश्य पूर्तता करणारे पब्लीक कम्पनी, किंवा युनीवरसीटी किंवा लोकल ऑथॉरिटी किंवा कोऑपरेटीव सोसायटी यांच्या कडुन घेतलेल्या कर्जाचे परतफेडीचे हप्ते. 

 35) वरील प्रकारच्या प्रापर्टीसाठीची स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन फीस किंवा इतर ट्रान्स्फर करण्यासाठी लागणारा खर्च वजावटीस पात्र आहे. 

 36) 5 वर्ष किंवा जास्त कालावधीसाठी बँकेत ठेवलेल्या ठेवी वजावटीस पात्र आहे 37) नाबार्ड ने काढलेले बॉण्ड या वर ही वजावट मिळते. 

 38) वरिष्ठ नागरिकांच्या सीनीयर सीटीझन सेव्हींग स्कीम 2004 मध्ये गुंतवणुक केल्यास वजावट मिळते. 

 39) पोस्ट ऑफीस टाइम डीपॉझीट रुल 1981 मध्ये 5 वर्षीय टाइम डीपॉझीट यास सुद्धा वजावट मिळेल. 

 40) सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम मध्ये ठेवलेले डीपॉझीट ही वजावटीस पात्र आहे.

इन्कमटॅक्सची अधिक माहिती आपण पुढच्या आठवडयात बघणार आहोत.