Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आज आपण कलम 80 (सी) खालील गुंतवणुक प्रश्नोतर रूपात परंतु सोप्या भाषेत बघणार आहोत. आता पर्यन्त आपण बघीतले की या कलमात 1,50,000/- रुपये गुंतवता येतात तथा इन्डीवीज्युअल व एच. यु. एफ. या करदात्यांना याचा फायदा मिळतो..

प्रश्न - कलम 80 (सी) खालील कोण कोणत्या गुंतवणुकीस वजावट मिळते ?
- प्रामुख्याने या कलमाखाली खालील गुंतवणुकीस वजावट मिळते.

1) एल. आय. सी. चे हफ्ते.

2) सरकारी नोकर द्वारा सेंट्रल गवर्नमेन्ट एम्प्लॉई इन्शुरन्स स्कीम मध्ये भरलेले प्रिमीयम वजावटीस पात्र ठरतात.

3) महाराष्ट्र सरकारच्या गवर्नमेन्ट एम्प्लॉई इन्शुरन्स स्कीम मध्ये भरलेले ग्रुप मधील पैसे वजावटीस पात्र आहेत.

4) कर्नाटक स्टेट गवर्नमेन्ट एम्प्लॉई ग्रुप इन्शुरन्स स्कीम 1981 मध्ये भरलेल्या पैशावर सुट मिळते.

5) फ्रंटिअर फोर्स ग्रुप इन्शुरन्स मध्ये भरलेल्या पैशावर ही सुट मिळेल.

6) नॉन कम्युटेबल डीफर्ड एन्युइटी मध्ये भरलेल्या हफ्तावर सुद्धा वजावट मिळेल.

इथे एक महत्वाची बाब अशी आहे की व्यक्तीच्या स्वतःच्या नावावर भरलेल्या हफ्तावर सुट मिळतेच परन्तु पत्नीच्या किंवा मुलाच्या नावावरही सुट मिळेल. परन्तु एच. यु. एफ. ने जर हे पैसे भरले तर नॉन कम्युटेबल डीफर्ड एन्युइटी मध्ये वजावट मिळणार नाही.

7) स्टॅच्युटरी प्रोविडन्ट फंड चे हफ्ते भरल्यास वजावट मिळेल यात लोन परतफेड धरली जाणार नाही.

8) 15 वर्षीय पब्लीक प्रोविडन्ट फंड मध्ये लिमीट मध्ये भरलेल्या रकमेची वजावट मिळते.

9) रेकग्नाइज्ड प्रोविडन्ट फंड मध्ये भरलेल्या रकमेची वजावट मिळेल.

10) हाउसिंग लोन मध्ये भरलेल्या रकमेची वजावट मिळेल.

11) सुपर एन्युएशन फंड मध्ये भरलेल्या पैशाची वजावट करदात्यास मिळते.

12) 10 किंवा 15 वर्षीय पोस्ट ऑफीस सेव्हिंग बँक (CTD) रुल 1959 मध्ये भरलेल्या स्कीम चे पैसे वजावटीस पात्र आहे.

13) नॅशनल सेव्हिंग स्कीम मध्ये भरलेली रकम वजावटीस पात्र आहे.

अजून या कलमाखाली येणाऱ्या बाबी कोणत्या आहेत, पत्नीच्या, मुलाच्या, आई वडिलाच्या नावाने भरलेल्या रकमेवर वजावट मिळते का ? अशा अनेक बाबींच्या उहापोह आपण पुढील लेखामध्ये बघणार आहोत.