Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स ३१

आज आपण बघणार आहोत की इन्कमटॅक्स रिटर्न कुठे दाखल करावे ? आपण इन्कमटॅक्स रिटर्न दाखल करण्याचे अनेक फायदे बघीतले. आज प्रश्नोत्तर रूपात पुढील माहिती सोप्या भाषेत बघणार आहोत, जी वाचकांना व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरावी.

प्रश्न - इन्कमटॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी कोणती ऑन-लाइन साइट आहे ? 
- इन्कमटॅक्स विभागाने ऑन-लाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या अनुसार आपल्यास https://incometaxindiaefiling.gov.in आणि www.incometaxindia.gov.in अशा पॉप्युलर साइट आहे.

प्रश्न - करदात्यास त्याचे स्वतः चे रिटर्न कुठे दाखल करावे, हे कसे समजावे ? 
- यासाठी वरील प्रश्नाच्या उत्तराच्या वेब साइट वर जावे लागेल. तेथे जाऊन आपले पॅन नंबर टाकावे. ही सुविधा " सर्विसेस " मध्ये उपलब्ध आहे. या वरून पॅन आणि टॅन टाकल्यानंतर त्या करदात्याच्या ज्युरिडिक्शन समजेल. अनेक करदात्यांना आता e फायलिंग कम्पलसरी केलेले आहे.

प्रश्न - टॅक्स पेअर्स चे ज्युरिडिक्शन कसे असते ? 
- सहसा मोठ्या शहराच्या आणि छोट्या शहराच्या ज्युरिडिक्शन मध्ये फरक असतो. छोट्या शहरात सर्व करदाते सहसा एक किंवा दोन अधिकाऱ्यांच्या अधिपत्य खाली असतात. परन्तु मोठ्या शहरात सर्व डॉक्टर्स एक आयकर अधिकाऱ्याकडे, सर्व पगारदार दुसऱ्याकडे, सर्व वकील, चार्टर्ड अकाउंटंट तिसऱ्याकडे सर्व ट्रस्ट चौथ्याकडे अशी विभागणी ही असते.

प्रश्न - कंपनीजचे तथा नॉन कंपनीज आधिपत्य कशावर ठरवले जाते ? 
- सहसा कंपनीजच्या रजिस्टर्ड ऑफिसच्या पत्यावरून कंपनीजचे तर नॉन कंपनीज चे आधिपत्य राहत्या घराच्या पत्यावरून ठरवले जाते. 

प्रश्न - रामराव यांना इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे समजल्यामुळे इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची इच्छा आहे ? डायरेक्ट रिटर्न भरता येइल का ?
- नाही, रामराव यांना डायरेक्ट रिटर्न भरता येणार नाही. सर्वात आधी त्यांना पॅन नंबर काढावे लागेल. पॅन नंबर ची अधिक माहिती आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. वाचकांना विनंती आहे की आपले प्रश्न व्हाट्सअँप वर विचारावे, फोन करू नये. इन्कमटॅक्स ची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.