Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स ३०

आपण गेल्या अनेक आठ्वड्यापासुन इन्कमटॅक्स फाइल बनवण्याचे विविध फायदे बघत आहोत. आपण कॅपीटल गेन टॅक्स बद्दल ही सविस्तर बघीतले. त्या आधी आपण पत्नी व मुलाच्या नावाने हप्ते भरल्यास कधी वजावट कायद्यात मिळते व कधी मिळत ही नाही, हे ही बघीतले. ए. टी. एम. वगेरे कार्ड धारकाची फसवणुक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल हे ही सविस्तर बघीतले. १ जुन २०१६ पासुन आलेली व काळ्या पैशा संबंधी योजनाही सविस्तर बघीतली. आता आपण इन्कमटॅक्स फाइल बनविण्याचे राहिलेले फायदे बघणार आहोत. जे व्यवहारात अत्यंत उपयोगी आहे. सहसा माणुस, इन्कमटॅक्स फाइल बनविने म्हणजे कटकट नको, असे वाटते. परन्तु खरे म्हणजे तसे काही नसते. हा उगीच प्रत्येकाच्या मनात बाऊ असतो, एवढेच.

प्रश्न- महिला आपल्या पती बरोबर पार्टनर कायद्याने होऊ शकतात का ? 

- होय, इन्कमटॅक्स कायद्याच्या १९९३-९४ या कर निर्धारण वर्षापासुन महिला आपल्या पती बरोबर कायद्याने पार्टनर कोणत्याही बीजनेस मध्ये होऊ शकतात. परंतु या साठी फाइल बनवावे लागते.

प्रश्न - वरील प्रश्ना प्रमाणे महिला आपल्या पती बरोबर पार्टनर झाल्या परन्तु भागीदारीत लावायचे कॅपीटल स्वतः चे नसुन पतीचे पैसे भांडवल म्हणून गुंतवले तर चालते का? 
- पतीच्या बरोबर भागीदारीत पतीचेच पैसे भांडवल म्हणुन गुंतवले तर पार्टनर तर होऊ शकतात परन्तु त्यास इन्कमटॅक्स चा फायदा मिळणार नाही. त्या महिलेचे उत्पन्न हे पतीच्या उत्पन्नात जोडले जाते, व एकूण सर्व उत्पन्नावर इन्कमटॅक्स लागते. म्हणजेच सोप्या भाषेत याला असे म्हणता येईल की इन्कमटॅक्स मध्ये इन्कमटॅक्स चा स्वतंत्र फाइल बनविण्याचा फायदा मिळणार नाही. अधिक स्पष्ट पणे याला असे म्हणता येईल की याला इन्कमटॅक्स कायद्याचे क्लबिंग सेक्शन (Clubbing provision 64) लागेल व खऱ्या अर्थाने उपयोग होणार नाही. क्लबिंग सेक्शन कशाला म्हणतात, ते काय आहे. हे आपण पुढे सविस्तर बघणार आहोत.

प्रश्न - भाडे, व्याज, कमीशन ईत्यादी मधुन टॅक्स कपात झाली तर ती परत मीळते का? 
- व्याज, भाडे, कमीशन ईत्यादी मधुन टॅक्स कपात करण्यात आली असेल तर यास इन्कमटॅक्स कायद्यात ‘टी. डी. एस.’ म्हणतात. हे टी. डी. एस. झालेले पैसे करदात्यास सरकारकडून परत मिळु शकतात. परन्तु हे पैसे परत मिळण्यासाठी त्या करदात्यास `दे रे हरी, पलंगावरी' या म्हनी प्रमाणे ऑटोमॅटीक मिळणार नाही. त्यास इन्कमटॅक्स मध्ये रीतसर रिटर्न भरून रिफन्ड ची मागणी करावी लागेल. म्हणजे इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याचा आणखी एक फायदा की कापलेले टॅक्स पुन्हा परत मिळ्ते. इन्कमटॅक्सची अधीक माहिती आपण पुढील आठवडयात बघणार आहोत.