Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स २९

सर्वात आधी वाचकांचे इन्कमटॅक्स संबंधी प्रश्नोत्तर देत आहोत.

प्रश्न - आमची जुन्या चाळी मध्ये सिंगल रूम होती. आता ती बिल्डींग री-डेवलप होऊन आम्हाला 375 स्क. फीट जागा मिळाली. ती जागा आम्हाला विकायची आहे. आणि त्याच बिल्डींग मध्ये 488 स्क. फीट दुसरी घ्यायची आहे. तरी आमची जागा विकतांना आम्हाला कॅपीटल गेन टॅक्स लागेल का ? याला किती वर्षाचा लॉगइन पीरीयड असतो ? पहिल्यांदा 3 वर्षाचा होता आता २ वर्षाचा झालाय, असे ऐकले आहे ? खर आहे का ? (विनायक पांडुरंग लीमये, दादर (वेस्ट) मुंबई 24 ) 
- तुम्हाला कॅपीटल गेन टॅक्स लागेल. बांधकामासाठी तीन वर्ष तथा नवीन फ्लॅट घेण्यासाठी दोन वर्षाचा लॉगइन पीरीयड असतो, हा लॉगइन पीरियड पुर्वी पासुनच कायद्यात दिलेला आहे . पुर्वी 3 वर्षाचा होता तो आता 2 वर्षाचा करण्यात आलेला आहे का ? असे काही नाही. बांधकाम करणे आणि विकत घेणे या दोन बाबी कायद्यात वेगळया वेगळ्या आहेत. (पुर्वी असेट लॉन्गटर्म होण्यास ३ वर्षांचा कालावधी होता तो आता २ वर्षांचा झाला आहे.).

प्रश्न - टी. डी. एस. (टॅक्स कपात) झाल्यास इन्कमटॅक्स रिटर्न फाईल करणे गरजेचे असते का ? कपात झालेले टॅक्स परत मिळतो का ? तो परत मिळावा, या साठी काय करावे लागते ? 
- टॅक्स कपात झाल्यास ते परत मिळविण्यासाठी इन्कमटॅक्स रिटर्न भरने आवश्यक आहे. रिटर्न दाखल केल्यास टी. डी. एस. झालेले टॅक्स काही अटीवर परत मिळु शकते. म्हण्जेच सोप्या भाषेत असे म्हणता येईल की रिटर्न दाखल केल्यास कपात केलेले टॅक्स परत मिळु शकते.

प्रश्न - भारता बाहेर जायचे असल्यास इन्कमटॅक्स रिटर्न भरने कायद्याने आवश्यक असते का ? 
- भारता बाहेर जाण्यासाठी सहसा टुरिस्ट व्हिजा देण्यात येतो. हा व्हिजा सहसा सहा महिन्याचा असतो. काही मोजके देश भारता बाहेर जाण्यास व्हिजा मागत नाही, ते पासपोर्ट च्या व्हॅल्यू वर भारतीय नागरिकांना परदेशात प्रवेश देतात. हे आंतरराष्ट्रीय मार्केट च्या पासपोर्ट व्हॅल्यु वर अवलंबून असतो. भारताची पासपोर्ट व्हॅल्यु सद्या फार मागे असुन ती 75 व्या स्थानावर असल्याचे सध्या बोलले जाते. सोप्या भाषेत यालाच आपण असे म्हणु शकतो कि जर आपण इन्कमटॅक्स रिटर्न रेग्युलर भरत असाल तर भारताबाहेर प्रवेश मिळण्यास याची फार मदत होते. इन्कमटॅक्स फाईल बनवण्याचे दुसरे फायदे तथा माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.