आता पर्यन्त आपण कॅपीटल गेन बद्दल सविस्तर बघीतले तसेच आपण बघीतले की नवीन फाईल भारतीय नागरिक सहसा का सुरु करत नाही, इन्कमटॅक्स फाइल बनविण्याचे फायदे इत्यादी बघीतले. आज आपण बाकी फायदे बघणार असुन त्या आधी वाचकांचे प्रश्नोत्तर जनहितार्थ देत आहोत.
प्रश्न - आमची प्रॉपर्टी, जी मुंबई स्थित आहे. ती पगडी पद्धतीची जागा आहे. ती विकणे आहे परन्तु त्याचे सर्व पैसे ब्लॅक मध्ये मिळणार आहे. तेव्हा ती रकमेवर कॅपीटल गेन टॅक्स लाउन ती व्हाइट करता येतील का ? कारण पुढील प्रॉपर्टी घेण्याकरिता संपूर्ण व्हाइट पैशाची गरज आहे. तेंव्हा यातून काय मार्ग आहे. आमच्या व्यवहाराची सरकार दरबारी नोंद होणार नाही तेंव्हा येणाऱ्या रकमेची व्यवहार कशी उपयोगी आणायची, तो मार्ग दाखवा.( प्रदीप पाटील, मुंबई )

- दोन नंबर मध्ये म्हण्जे आपणास ब्लॅक चे पैसे मिळणार आहेत, ते तुम्हाला व्हाईट मध्ये दाखवायचे आहे. असा आशयाचा तुमचा प्रश्न आहे. डायरेक्ट ब्लॅक चा पैसा व्हाईट करण्याचा असा कुठलाही कायदा नाही. त्याला तुम्हाला कायद्याच्या रीतसर प्रोसीजरनेच जावे लागेल. ब्लॅक चा व्हाईट करण्याची स्कीम होती. जी आता बंद झाली आहे. तुम्ही पगडीचे पैसे सुद्धा व्हाईट मध्ये घेऊ शकता. याला काही अडचण नाही, अशा आशयाचे स्टेटमेन्ट मुंबई हायकोर्टाने अल्पना चीनई केस मध्ये सांगीतले आहे. तुम्ही चेक ने पगडीचे पैसे घेतले तर तुम्हाला त्याची व्यवस्थित अकाउंटिंग करता येऊ शकेल व त्यावर तुम्ही नवीन प्रॉपर्टी घेतल्यास कॅपीटल गेन टॅक्स माफी सुद्धा मागु शकता. परन्तु या दोन नंबर मध्ये जर पैसे घेतले तर त्यास इतर उत्पन्न दाखवुन टॅक्स भरल्यास तुम्हाला त्या उत्पन्नाचे सोर्स दाखवता येणार नाही. यासाठी पगडीचे जरी पैसे असेल तरी तुम्ही ते व्हाईट मध्ये चेक ने घेतल्यास ते तुमच्या कायम हिताचे राहील. नवीन कायद्याच्या कलम 115 BBE अनुसार आपण फ्लॅट 60 टक्के टॅक्स तथा सेसही भरू शकता परन्तु अधीक कायदेशीर गोष्टी प्रत्येक केसच्या फॅक्ट वर अवलंबून असतात अधीक माहिती साठी जवळच्या सी ए शी संपर्क साधावा व मगच याचे निर्णय घेतल्यास ते कायम स्वरूपी हिताचे राहील. ब्लॅक चा पैसा घेणे आजच्या काळात नक्कीच हिताचे राहणार नाही. पुढील आठवड्यात इन्कमटॅक्स ची अधीक माहिती तथा नवीन प्रश्नोत्तर बघणार आहोत.