Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स २६

आता पर्यन्त आपण कॅपीटल गेन बद्दल सविस्तर बघीतले तसेच आपण बघीतले की नवीन फाईल भारतीय नागरिक सहसा का सुरु करत नाही, इन्कमटॅक्स फाइल बनविण्याचे फायदे इत्यादी बघीतले. आज आपण बाकी फायदे बघणार असुन त्या आधी वाचकांचे प्रश्नोत्तर जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न - मा. मुंदडा साहेब ; सुनबाईचे लग्नाआधी तीन - चार बँकेत खाते आहे. त्या खात्यात थोडेसे पैसे ही आहेत. तीचे स्वतः चे माहेरचे आधार कार्ड, पॅनकार्ड ही आहे. तेच बँकेत दिलेले आहे. आता इकडे म्हण्जे सासरला पतीच्या नावाने आधार कार्ड , पॅनकार्ड दुरुस्ती करून प्राप्त झाले आहे. त्यामुळे विवाहाच्या आधीचे बँक खाते ऑपरेट करण्यासाठी काय करावे लागेल ? जुन्या आधार कार्ड व पॅनकार्ड चा वापर करता येइल का ? आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी कोणते कार्ड वापरावे लागतील ? आधीच्या बँक खात्यामध्ये विवाहानंतरचे नाव बदलून मिळेल का ?
( पगारे पी. एम, नाशिक ) 
- विवाहाच्या आधीच्या बँक खाते ऑपरेट करण्यासाठी सुद्धा नवीन अपडेटेड पॅन कार्ड व आधार कार्ड चा वापर करावा. पॅन कार्ड नवीन नावाने असले तरी पॅन कार्ड नंबर जुनेच असते. एका व्यक्तीस दोन पॅन कार्ड घेता येत नाही आणि जर घेतलेच तर ते एकदम चुकीचे आहे. त्याला दण्ड ही लागु शकतो. यासाठी आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी नवीन कार्ड वापरावे. आधीच्या बँक खात्यामध्ये विवाहानंतरचे नाव बदलून मिळु शकेल का या तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. मागणी केल्यानंतर तुम्हाला नाव बदलून मिळु शकते. आता आपण इन्कमटॅक्स चा नवीन विषय बघणार आहोत. की इन्कमटॅक्सची फाइल बनवण्यात महत्वाचे काय फायदे आहेत.
प्रश्न - पगारदार नोकरांना इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याचा काय फायदा आहे ? - पगारदार माणसांना आयुष्यभर पगार मिळतो व रिटायरमेंटच्या वेळेपर्यंत त्यांच्याकडे खूप पैसे जमा होऊ शकतात जर इन्कमटॅक्स रिटर्न व्यवस्थित भरून बॅलेन्स दाखवले असेल तर अशा वेळेस पगारदाराला दाखवण्यात काहीच अडचण येत नाही. तेच जर व्यवस्थित नियोजन केले नसेल तर इन्कमटॅक्सचा ससेमीरा त्यांच्या मागे लागण्याची दाट शक्यता असते. त्यांना व्यवस्थित उत्तर इन्कमटॅक्स विभागाला देता येणार नाही. पुढील आठवड्यात आपण इन्कमटॅक्स फाइल बनवण्याचे दुसरे अनेक फायदे बघणार आहोत.