गेल्या दोन आठवड्यापासुन आपण बघीतले की इन्कमटॅक्स फाइल बनवण्याबद्दल लोकांची मानसिकता काय आहे ? किती लोक भारतात इन्कमटॅक्स भरतात ? नवीन फाइल बनविण्यासाठी लोक का घाबरतात ? नवीन फाइल बनविण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा असते का ? असे अनेक प्रश्नाचे उहापोह केले. आज आपण ऑन लाइन रिटर्न भरण्याचे काय परिणाम होणार आहे. या वर संक्षिप्त माहिती बघणार आहोत. त्या आधी वाचकांचे प्रश्न - उत्तर जनहितार्थ देत आहोत.
प्रश्न - मी मार्च 2017 च्या शेवटी फ्लॅट सेलची अग्रीमेन्ट केले. आणि मला पैसे एप्रिल मध्ये मिळाले. आणि मी कॅपीटल गेन अकाउंट अजुन उघडले नाही. कारण मला दुसरा फ्लॅट घ्यायचा होता परन्तु त्या बिल्डिंगला अजुन NOC मिळाली नाही. मी कॅपीटल गेन अकाउंट उघडु शकतो का ? मार्च 2018 पर्यन्त NOC मिळण्याची शक्यता आहे ? सध्या मी काय करू ? ( सुनील शिवाजी हालदनकर, विरार ( प )
- तुम्हाला कॅपीटल गेन अकाउंट सहा महिन्याच्या आत किंवा रिटर्न फाइल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यन्त उघडायला पाहिजे. ती तुमची मुदत निघुन गेली असल्यामुळे तुम्ही आता कॅपीटल गेन अकाउंट उघडले तर त्याचा फायदा मिळणार नाही. मात्र तुम्हाला नवीन फ्लॅट दोन वर्षा पर्यन्त घ्यायला चालतो. नवीन फ्लॅट घेण्यासाठी अजुन ही मुदत आहे. यामुळे मुदतीत नवीन फ्लॅट मध्ये पैसे गुंतवावे म्हण्जे तुम्हाला कॅपीटल गेन माफी पासुन सुट मिळेल (पण तुमचे त्या आर्थिक वर्षाचे रिटर्न फाईल केलेले नसावे). आता आपण इन्कमटॅक्स ची नवीन माहिती बघणार आहोत.
प्रश्न - ऑन लाइन आणि कॉम्पुटरायझेशन मुळे करदात्यावर काय परिणाम होणार आहे ?
प्रश्न - ऑन लाइन आणि कॉम्पुटरायझेशन मुळे करदात्यावर काय परिणाम होणार आहे ?
- आज ऑन लाइन रिटर्न हे कंपलसरी झाल्यामुळे सर्व व्यवहार इन्कमटॅक्स मध्ये कॉम्प्युटराइजड झालेले आहे. यामुळे कारदात्याची कुठलीही माहिती इन्कमटॅक्स विभागातून लपून राहत नाही, जी पूर्वी राहण्याची शक्यता होती. आता 98% इन्कमटॅक्सचे रिटर्न सुद्धा काही प्रश्न करदात्याला न विचारताच मंजुर होतात. म्हणून इन्कमटॅक्स विभागाला सर्व माहिती खरोखर व तंतोतंत देणे हे करदात्याच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. इन्कमटॅक्स रिटर्न कोणी दाखल करणे गरजेचे आहे तथा फायद्याचे आहे, हे आपण पुढील आठवड्यात बगणार आहोत.