गेल्या वेळेस आपण इन्कमटॅक्स फाइल बद्दल बघीतले. आपण सध्या चे टॅक्स दर ही बघीतले. आज आपण इन्कमटॅक्स वर लागणाऱ्या सेस बद्दल, तसेच कलम 87 A खाली मिळणारी सवलत बघणार आहोत. त्या आधी वाचकांचे प्रश्न उत्तर जनहितार्थ देत आहोत.
प्रश्न - माझ्या आजोबांना त्यांचे घर विकायचे आहे. व दुसरीकडे घ्यायचे आहे. तरी मला माहिती हवी होती की पहिल्या घराचे जे रुपये मिळाले त्या वर किती कर लागु शकतो. बाबांचे वय 84 वर्ष आहे. त्यांना रुपये 3000000 मिळाले आणि त्यांना 2000000 पर्यंत दुसरे घर घ्यायचे आहे. कृपया मदत हवी होती. (अभिजीत फाले, मुलुंड (प) मुंबई )

- तुम्हाला आधी कॉस्ट ऑफ एक्वीझिशन काढावे लागेल. तुमचे घर कधी विकत घेतले होते. त्याची तारीख लागेल. जर घर वडीलोपार्जीत असेल तर आर्थिक वर्ष 2001-2002 चे बाजार मुल्य याला कॉस्ट ऑफ एक्वीझिशन म्हण्जे शॉर्टमध्ये खरेदी किंमत धरली जाइल. त्या वर इंडेक्सेशन किंमत काढली जाइल. पूर्वी 1 एप्रील 1961 ची किंमत धरली जात होती. त्या आलेल्या किमतीला 30 लाख विक्री किंमत मधुन कमी करून त्याच्यावर कॅपीटल गेन म्हण्जे भांडवली नफा काढला जाइल. आलेल्या नफ्यातून 20 लाखाचे नवीन घर खरेदी केली आहे, ती किंमत वजा करावी व आलेल्या निव्वळ ( भांडवली) नफ्यावर 20 टक्के प्रमाणे टॅक्स लागेल.
प्रश्न - कलम 87 A काय आहे ?
प्रश्न - कलम 87 A काय आहे ?
- ज्या करदात्यांचे उत्पन्न साडे तीन लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांना जास्तीत जास्त 2500/- रुपया पर्यन्त इन्कमटॅक्स माफी या कलमा द्वारे मिळेल.
प्रश्न - कलम 87 A चा परिणाम काय आहे ?
- या कलमाचा परिणाम असा आहे की 3 लाख रु. पर्यन्त व्यक्तीला इन्कमटॅक्स लागणार नाही. (जर त्याचे उत्पन्न 350000/- पेक्षा जास्त नसेल तर) याचाच सोप्या भाषेत अर्थ असा की जर व्यक्तीचे उत्पन्न 350000/- रु. पेक्षा जास्त नसेल तर त्याला 3 लाख रु. पर्यन्त इन्कमटॅक्स अजिबात लागणार नाही.
प्रश्न - सरचार्ज तथा एज्युकेशन सेस कसा लागेल ?
एज्युकेशन सेस हा इन्कमटॅक्स आणि सरचार्ज चा 3 % लागेल.
इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढील आठवड्यात बघणार आहोत.
प्रश्न - सरचार्ज तथा एज्युकेशन सेस कसा लागेल ?
|
50 लाखा पर्यन्त
|
निल
|
|
50 लाख ते 1 कोटी
पर्यन्त
|
10 % of इन्कमटॅक्स
|
|
1 कोटी च्या वर
|
15 % of इन्कमटॅक्स
|
एज्युकेशन सेस हा इन्कमटॅक्स आणि सरचार्ज चा 3 % लागेल.
इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढील आठवड्यात बघणार आहोत.