Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स २२

आजपासुन आपण इन्कमटॅक्सचे नवीन विषय बघणार आहोत. आता पर्यन्त आपण कॅपीटल गेन बद्दल सविस्तर बघीतले. वाचकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. अजुन ही आपले काही प्रश्न असल्यास आपण लेखी स्वरूपात व्हॅटस अप वर विचारू शकता. आज आपण इन्कमटॅक्स बद्दल ची नवीन जनरल माहिती सोप्या परंतु प्रश्नोत्तर रूपात नेहमी प्रमाणे बघणार आहोत.

प्रश्न - भारतात किती टक्के लोक इन्कमटॅक्स भरतात ? 
- भारतात मुश्कीलीने लोकसंख्येचे दोन टक्के लोक इन्कमटॅक्स भरतात. म्हण्जे 98 टक्के लोक इन्कमटॅक्सला एकतर लागु नाही किंवा मुद्दाम भरत नाही, असे अर्थ निघते.

प्रश्न - लोक इन्कमटॅक्स फाइल का बनवत नाही ? 
- या विषयाचे तज्ञ लोकांनी बारीक अभ्यास व विश्लेषण केले. ते या विषयी त्यांचे असे मत झाले की इन्कमटॅक्स फार किचकट विषय आहे. त्यांची मानसीक स्थिती त्यांना इन्कमटॅक्स बद्दल मनात भीती निर्माण करते. त्यांना असे वाटते की एकदा इन्कमटॅक्स फाइल बनवली की त्यांना आयुष्यभर त्रास सोसावा लागेल, इत्यादी म्हणून सहसा लोक इन्कमटॅक्स फाइल बनवत नाही.

प्रश्न - पूर्वीपेक्षा आजचे इन्कमटॅक्सचे दर जास्त आहे का कमी आहे ? 
- पूर्वीपेक्षा आता इन्कमटॅक्सचे दर कमी आहेत व ते दिवसेंदिवस कमी करण्याकडे प्रत्येक सरकारचे कल दिसते. आर्थिक वर्ष 2014-15 पासुन इन्कमटॅक्स ची मर्यादा 2 लाख 50 हजार पर्यन्त वाढवण्यात अली आहे.

प्रश्न - चालु वर्षासाठी इन्कमटॅक्सचे दर काय आहे ? 
- आता नवीन दर खालील प्रमाणे आहे.
उत्पन्न मर्यादा
टॅक्स दर
250000 पर्यन्त
निल
250000 ते 500000
5%
500000 ते 1000000
20%
1000000 च्या वर
30%

साठ वर्षाच्या वरिष्ठ नागरिकांना खालील दर लागु आहे.
उत्पन्न मर्यादा
टॅक्स दर
3 लाख रु. पर्यन्त
निल
3 लाख ते 5 लाख पर्यन्त
5%
5 लाख 1 ते 10 लाखा पर्यन्त
20%
10 लाख 1 च्या वर
30%



अतिवरिष्ठ नागरिक ज्यांचे वय 80 वर्षाच्या वर आहे, त्यांना खालील दर लागु आहे.
उत्पन्न मर्यादा
टॅक्स दर
5 लाख रु. पर्यन्त
निल
5 लाख 1 रु. ते 10 लाख
20%
10 लाख 1 रु. च्या वर
30%



पुढच्या आठवड्यात आपण कलम 87 ए बद्दल बघणार आहोत. आपण बघणार की 2500/- रु. चे एक्सट्रा बेनेफीट कोणाला व कधी मीळेल, इन्कमटॅक्स फाइलचे फायदे काय ? तथा असे अनेक इन्कमटॅक्स बद्दलचे प्रश्न पुढील आठवड्यापासून बघणार आहोत, जे वाचकांना व्यवहारात उपयोगी ठरावे.