Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स २०

आज आपण अत्यंत महत्वाचा विषय बघणार आहोत. आपण गेल्या आठवड्यापासुन कुठली ही मालमत्ता विकली तरी त्या वर एक तर कॅपीटल गेन टॅक्स अजिबात लागु नये किंवा कमीत कमी टॅक्स कसा लागेल, हे बघत आहोत. याची अधिक माहिती खालील प्रश्न उत्तरात बघता येइल. त्या आधी नेहमी प्रमाणे वाचकांचे प्रश्नोत्तर जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न - मी एक वरिष्ठ नागरिक आहे. माझ्या आई वडिलांच्या नावावर एक फ्लॅट होता. ते दोघे आता जीवंत नाहीत. आमची सोसायटी Re-develop ला चालली आहे. त्या मध्ये मला 800 Sq. Feet मिळणार आहे. परंतु मी 500 च घेणार 300 Sq. Feet Surrender बिल्डरला करणार. ते 300 Sq. Feet मिळणाऱ्या पैशावर कॅपीटल गेन टॅक्स लागेल का ? तो बिल्डर 8 टप्याटप्याने पैसे देणार आहे, तर कॅपीटल गेन लागेल का ? मला तुमचे लेखन आवडते कारण त्या वरून सामान्य माणसांना ही कळते की काय करावे ?
( अरुण शेजवलकर, ठाणे ) 

- तुम्हाला 800 Sq. Feet च्या बदल्यात 500 Sq. Feet चे फ्लॅट मिळत आहे. कायदयात हे हस्तांतरण झाले असे समजण्यात येते व कायद्याच्या चौकटीत तथा टाइम लिमिट मध्ये नवीन फ्लॅट मिळाले तर त्या बदल्याच्या मिळालेल्या फ्लॅट वर कॅपीटल गेन टॅक्स लागणार नाही. असे निर्णय मुंबई ट्रिब्युशनल ने श्रीमती विना गोपे श्रोऑफ विरुद्ध इन्कमटॅक्स ऑफीसर मध्ये दिलेले आहे. बिल्डरला जेव्हा करदाते आपला जुना फ्लॅट देऊन बदल्यात नवीन घेतात त्यातही कलम 2 (47) अनुसार हस्तांतरण धरले जाते व ते टाइम लिमिट मध्ये दिले गेले नसेल तर त्या वर टॅक्स लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच सोप्या भाषेत असे म्हणता येइल की 2 वर्षाच्या आत मिळालेल्या फ्लॅट वर कॅपीटल गेन टॅक्स लागणार नाही.तुम्हाला 300 Sq. Feet जागेच्या बदल्यात जे पैसे बिल्डर देणार आहे. त्या वर तुम्हाला कॅपीटल गेन टॅक्स भरावा लागेल. याची सविस्तर तथा सरवोल चर्चा प्रत्यक्ष भेटून तुमच्या सी. ए. शी करावी तथा मार्गदर्शन घेणे उचित राहील.

प्रश्न - या कलमाचा फायदा मिळण्यासाठी नवीन फ्लॅट घेण्यासाठीची पुढील कालमर्यादा किती आहे ? 

- नवीन राहते घर घेण्यासाठीची खरेदी ची मर्यादा दोन वर्षाची आहे.

प्रश्न - बांधकाम नवीन करायचे असेल तर कालमर्यादा किती आहे ?

- नवीन बांधकाम करण्यासाठी काल मर्यादा तीन वर्षाची आहे. या कलमाची इन्कमटॅक्स मधील अधिक माहिती पुढच्या आठवढयात बघणार आहोत.