Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स १९

गेल्या अनेक आठवड्यापासुन आपण कॅपीटल गेन बद्दल बघत आहोत. त्यात आपण बघीतले की राहते घर जर हस्तांतरीत झाले तर त्याचे परिणाम कसे होतात. नवीन घर कधी घ्यायला पाहीजे म्हण्जे कॅपीटल गेन मध्ये सुट मिळते. प्रपोरशनेट बेनेफीट म्हण्जे काय ? कॅपीटल बॉण्ड म्हण्जे काय ? यात किती रुपये गुंतवता येतात अशा अनेक बाबी बघीतल्या. आज पासुन आपण कॅपीटल गेन मध्ये सुट मिळण्यासाठीचे नवीन कलम ची सुरुवात करणार आहोत. जे व्यवहारात वाचकांना अत्यंत उपयोगी ठरावे. त्या आधी नेहमी प्रमाणे वाचकांचे प्रश्नउत्तर जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न - माझा 1 BHK फ्लॅट होता तो विकुन जे पैसे आलेत त्या पैशांवर कॅपीटल गेन टॅक्स वाचवण्याकरिता त्या पैशांनी घरा ऐवजी जमीन घेतली तर चालेल का ? ( राकेश जोशी, कल्याण ) 
- तुम्हाला कॅपीटल गेन वाचवण्यासाठी त्या पैशांनी घरा ऐवजी जमीन घेतली तर चालणार नाही. तुम्हाला कॅपीटल गेन पासुन सुट मिळण्यासाठी इतर मार्ग अवलंबावे लागतील. तुम्ही घर घेऊ शकता किंवा बॉण्ड मध्ये ही टाकू शकता.

प्रश्न - कलम 54 एफ काय आहे ? 
- आता आज पासून आपण कॅपीटल गेन चे नवीन कलम बघणार आहोत. अनेक मध्यवर्गीय नागरिक आपली ज्वेलरी, सोनं, चांदी, शेअर्स, जमीन विकतात तथा त्या आलेल्या पैशांना राहण्यासाठी घर विकत घेतात. जर त्यांना विक्री केलेल्या मालमते तून आलेल्या पैशावर टॅक्स लावले. तर त्यांना आपले स्वतः चे घर विकत घेणे शक्य होणार नाही. त्या मध्यमवर्गीय लोकांना राहते घर विकत घेणे शक्य व्हावे, यासाठी कलम 54 एफ ची निर्मिती करण्यात आली आहे.


प्रश्न - हे कलम नेमके काय आहे ? 
- काही मालमतेच्या हस्तांतरण केल्या नंतर आलेल्या पैशातून जर राहते घर घेण्यात आले तर कॅपीटल गेन टॅक्स ची सुट मिळते.

प्रश्न - या कलमाची सुट कोणाला मिळते ? 
- या कालमाखाली कॅपीटल गेन ची सुट व्यक्ती किंवा एच. यु. एफ. यांना दिली जाते. सोप्या भाषेत म्हण्जेच व्यक्ती किंवा एच. यु. एफ. यांनी जर मालमत्ता विकून नवीन राहते घर विकत घेतले तर कॅपीटल गेन टॅक्स लागणार नाही. याचाच अर्थ की कंपनी किंवा इतर करदात्यांना या कलमाचा लाभ मिळणार नाही.

या कलमाखाली करदात्यांना सुट कशी मिळते ? ती किती मिळते ? नवीन घरा संबंधी काय काय अटी कायद्यात आहेत ? या बद्दल ची माहिती आपण पुढच्या आठवड्यापासुन बघणार आहोत.