Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स १४

आज आपण कॅपीटल गेन चे नवीन कलम 54 (बी) बघणार आहोत. आता पर्यंत आपण कलम 54 बघीतले ज्यात घर विकुन आलेले पैसे राहत्या घरात परत गुंतवल्यास कॅपीटल गेन सुट मिळत होती. आज आपण 54 (बी) हे कलम बघणार आहोत ज्यात शेतीची जमीन हस्तांतरीत झाल्यास कॅपीटल गेन कशी व कधी मिळेल या बद्दलची माहिती सोप्या भाषेत बघणार आहोत, जी वाचकांना व्यवहारात कॅपीटल गेन सुट घेण्यासाठी उपयुक्त ठरावी.

प्रश्न - इन्कमटॅक्स कायद्यातील कलम 54 (बी) काय आहे ? - शेतीतील जमीन हस्तांतरीत केल्यास आलेल्या पैशावर कॅपीटल गेन म्हण्जे इन्कमटॅक्स लागु नये, यासाठीचे नियोजन म्हण्जे कलम 54 (बी) आहे.

प्रश्न - कलम 54 (बी) ची सुट कोणत्या करदात्यांना मिळते ? - कलम 54 (बी) ची सुट पूर्वी व्यक्तींना मिळत होती परन्तु 2012 च्या बजेट नंतर ही सुट एच. यु. एफ. यांना ही वाढवण्यात आली म्हण्जे सोप्या भाषेत असे म्हणता येइल की कलम 54 (बी) ची सुट सध्या व्यक्ती म्हण्जे इंडिविज्युअल (Individual) आणि एच. यु. एफ. या दोघांना मिळते.

प्रश्न - रूरल एरिया म्हण्जे ग्रामीण भागात असलेल्या शेतीच्या जमिनीवर कॅपीटल गेन टॅक्स लागतो का ? - नाही. ग्रामीण भागात असलेली जमीन ही कॅपीटल असेटच्या परिभाषेत येत नसल्यामुळे ती जमीन कॅपीटल असेट नाही. आपण सुरुवातीलाच मागील काही आठवड्यापूर्वी बघीतले होते की कॅपीटल असेट नाही तर कॅपीटल गेन टॅक्स लागत नाही. यामुळे शेती कॅपीटल असेट नाही तथा त्यावर कलम 54 (बी) ची सुट ही नाही. यालाच सोप्या भाषेत असे म्हणता येइल की ग्रामीण भागातील शेतीला इन्कमटॅक्स लागणार नाही.
प्रश्न - कलम 54 (बी) ची सुट ही दीर्घ कालीन भांडवली नफ्यासाठी आहे की अल्पकालीन भांडवली नफ्यासाठी आहे ? - या कलमाची सुट दोन्हीसाठी म्हण्जे लॉन्ग टर्म कॅपीटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपीटल गेन दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

प्रश्न - शहरी जमीन विकण्यास कलम 54 (बी) ची सुट मिळते का ? - होय. हे कलम शहरी जमीन म्हण्जे नागरी जमीन यासाठीच आहे. ही जमीन हस्तांतरित झाल्यास कलम 54 (बी) ची सुट मिळू शकते.
पुढील आठवड्यात आपण कम्पलसरी एक्विझिशन म्हण्जे काय ? कम्पलसरी एक्विझिशन मध्ये जमीन हस्तांतरित झाल्यास सुट मिळते का ? जर मिळत असेल तर ती कलम 54 (बी) खाली मिळते की दुसऱ्या कुठल्या कलमा द्वारे मिळते ? कलम 54 (बी) खाली सुट मिळण्यासाठी नवीन जमीन किती वर्षात खरेदी करावी लागेल ? ती नवीन जमीन ग्रामीण भागात घ्यावी का शहरी भागात आशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुढील आठवड्यात बघणार आहोत, जी वाचकांना व्यवहारात इन्कमटॅक्स वाचवण्यासाठी उपयोगी ठरावी.