Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स १३

आता पर्यन्त आपण कॅपीटल गेन मध्ये अनेक बाबीवर चर्चा केली. आपण घर विकून नवीन राहते घर घेतल्यास कशी माफी मिळते. त्याच्या अटी बघीतल्या. आज आपण विविध बाबी असल्यास कॅपीटल गेनची परिस्थिती काय असते. या वर प्रश्नोत्तर रूपात चर्चा करणार आहोत.

प्रश्न - पवन आर्य यांनी एक राहते घर विकून दोन स्वतंत्र घर घेतली. दोन्ही घरे वेगवेगळ्या ठिकाणी होती, तथा कलम 54 ची माफी मागीतली परन्तु आयकर अधिकाऱ्याने ती नाकारली. त्यांनी एका घरा पुरतेच एक्झम्पशन (सूट) दिली. आता पवन आर्य यांनी काय करावे ?
- वरील केस पवन आर्य विरुद्ध कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स याचा असुन या बाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे. सदर केस मध्ये पवन आर्य यांनी एक घर विकून दोन फ्लॅट खरेदी केले. आयकर अधिकाऱ्याने एकाच घरावर सुट दिली. केस कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स कडे अपील साठी गेले आणि तेथे कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स यांनी इन्कमटॅक्स ऑफीसरचे निर्णय फिरवले त्यांनी पवन आर्य यांना दोन्ही घराची कॅपीटल गेन मध्ये सुट दिली. कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स यांनी डी. आनंद बसप्पा विरुद्ध इन्कमटॅक्स ऑफीसर या केसचे आधार घेतले परन्तु ट्रिब्युनल यांनी कमिश्नरचे केसच्या विरुद्ध निर्णय दिले. नंतर सदर केस हे पंजाब ऍण्ड हरियाणा हायकोर्टात गेले. या प्रकरणी कोर्टाने करदात्याच्या विरोधात निर्णय दिले. कोर्टाने सांगीतले की कलम 54 ची सुट फक्त एका घरावर घेता येइल. कोर्टाने डी. आनंद बसप्पाचे केस हे कसे आहे हे नमुद केले. त्यांनी सांगीतले की डी. आनंद बसप्पा यांनी ही दोन फ्लॅट घेतले होते परन्तु दोन्ही मिळून एकच युनिट करण्यात आले होते. ते दोन्ही फ्लॅट एकच घर म्हणून वापरण्यात येत होते परन्तु सदरची केस वेगळी असुन यात पवन आर्य यांनी दोन फ्लॅट दोन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले आहे, म्हणून करदात्याला दिलेली सुट नाकारण्यात आली. यालाच सोप्या भाषेत असे म्हणता येइल की दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन घरे घेतली असल्यास कलम 54 ची सुट करदात्यास मिळत नाही.

कॅपीटल गेन बद्दलची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.