Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स १५

सध्या आपण कॅपीटल गेन बद्दल बघत आहोत. आज पर्यन्त आपण अनेक महत्वाच्या बाबी बघितल्या. आज आपण त्या बद्दल अधिक माहिती बघणार आहोत. त्या पूर्वी नेहमीप्रमाणे वाचकांचे प्रश्नउत्तर बघत आहोत.

प्रश्न - मला आपल्याला एक प्रश्न करायचा आहे की पतपेढी मध्ये जे दैनंदिन ठेव प्रतिनिधी आहेत त्याचा आम्ही TDS कापतो परंतु आता GST मुळे TDS कापेल का ? किंवा GST किती टक्के लागेल ? गोरख थळे, मा. ग्रामपंचायत सदस्य, वेहेळेगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे. वरिष्ठ अधिकारी, सह्याद्री नागरी सहकारी पत संस्था मर्यादित, भिवंडी. - इन्कमटॅक्स कायद्यातील TDS आपण नेहमीप्रमाणे कापत राहावे. GST चे TDS कापण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आता आपण नेहमीप्रमाणे आपला कॅपीटल गेन चा विषय बघणार आहोत. सध्या आपण गेल्या काही आठवड्यापासून इन्कमटॅक्सच्या कलम 54 (बी) बद्दल बघत आहोत.

प्रश्न - या कलमाखाली सूट मिळण्यासाठी करदात्याने किती वर्षात नवीन शेत खरेदी करायला पाहीजे ? - या कलमाखाली सुट मिळण्यासाठी नवीन शेतीची खरेदी ही दोन वर्षाच्या आत करायला पाहीजे. याचाच अर्थ असा की जमिनीचे हस्तांतरण झाल्यानंतर नवीन जमीन दोन वर्षाच्या आत खरेदी करायला पाहीजे.

प्रश्न - या कलमाखाली सुट मिळण्यासाठी नवीन घेतलेली जमीन ही ग्रामीण भागातील जमिनीची खरेदी पाहीजे की शहरी भागातील जमीन पाहीजे ? - या कलमाखाली सुट मिळण्यासाठी नवीन खरेदी केलेली जमीन ही ग्रामीण भागातील जमीन असणे असे आवश्यक नाही. ही जमीन ग्रामीण किंवा शहरी जमीन ही चालते.

प्रश्न - नवीन खरेदी केलेली जमीन ही किती वर्षा पर्यन्त हस्तांतर करता येणार नाही ? - नवीन खरेदी केलीली जमीन ही कमीत कमी ३ वर्षा पर्यन्त हस्तांतर करता येत नाही. याचाच अर्थ असा की एकदा जमीन खरेदी केली तर ती जमीन तीन वर्ष पुन्हा विक्री करता येणार नाही. एकदा घेतलेली जमीन तीन वर्षा पर्यन्त सांभाळणे कायद्याने आवश्यक आहे.

आता पर्यन्त आपण घर विकून नवीन घर घेतल्यास टॅक्स मध्ये कशी सुट मिळते तथा हस्तांतरण झाल्यास नवीन शेती घेतल्यास कधी टॅक्स मध्ये सूट मिळते, हे बघीतले. आता पुढील आडवड्यात इन्कमटॅक्स कायद्यामध्ये करदात्यास सूट चे नवीन कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याची माहिती घेणार आहोत. यात प्रामुख्याने ठराविक बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक केल्यास भांडवली करात माफी कधी मिळते, तसेच राहते घर सोडून इतर दीर्घ मुदतीची भांडवली मालमता विकून मिळणारी निव्वळ रक्कम राहण्याच्या घरामध्ये गुंतविल्यास मिळणारी सुट वगेरे ची सविस्तर माहिती पुढील आडवड्यापासून बघणार आहोत.