आपण सध्या कॅपीटल गेन बद्दल बघत आहोत. आता पर्यन्त आपण कॅपीटल असेट, कॅपीटल गेन टॅक्स माफी, इन्फ्लेशन इंडेक्स, लॉंग टर्म तथा शॉर्ट टर्म कॅपीटल गेन सह अनेक बाबीवर चर्चा केली. सध्या आपण कलम 54 बद्दल माहिती बघत आहोत. घर विकून जर हे पैसे पुन्हा नवीन घर घेण्यासाठी लावले, तर टॅक्स माफी कधी मिळते, यावर बघत आहोत. आज आपण त्यावर पुन्हा जास्तीची माहिती बघणार आहोत, परन्तु त्या पूर्वी नेहमी प्रमाणे वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.
प्रश्न - मी एक शेतीची जमीन (कवळ पड लॅण्ड) नेटिव्ह प्लेस मध्ये विकली. या आलेल्या पैश्यावर मला इन्कमटॅक्स लागेल का ? (विनय, राजाराम सावंत, मुंबई)
- शेतीची जमीन विकली तर सध्या टॅक्स लागत नाही. परन्तु ही जमीन नेमकी कुठे आहे ? आपण म्हण्टल्याप्रमाणे ती शेतीची जमीन आहे का ती पडीत आहे. यावर टॅक्स लागणार. मग ती नेमकी कुठे आहे ? त्या गावाची लोकसंख्या किती आहे ? कॅपीटल असेटच्या परिभाषेत बसणार का ? ईत्यादी अशा अनेक बाबी तपासल्या पाहीजेत. यासाठी आपण सी. ए. शी प्रत्यक्ष चर्चा करावी.
प्रश्न - कलम 54 मध्ये माफी मिळण्यासाठी काय काय अटी आहेत ?
- जर राहते घर ट्रान्सफर करण्यात आले तर त्याचे री-इन्वेस्टमेन्ट खालील कोणत्याही एका प्रकारे होणे आवश्यक आहे म्हण्जे कॅपीटल गेन माफी मिळते. यापैकी पहिली कंडीशन आहे की नवीन घर हा घर ट्रान्सफर करण्यापूर्वी एक वर्षा पूर्वी खरेदी केले असले पाहीजे. दुसरा पर्याय असा असु शकतो की घराचे हस्तांतरण झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत नवीन घर घेता येते आणि तिसरा पर्याय असा असु शकतो की जर घर नवीन बांधायचे असेल तर तीन वर्षा पर्यन्त नवीन घराचे बांधकाम करता येईल.
प्रश्न - एकदा का नवीन घर बांधले किंवा विकत घेतल्यानंतर पुन्हा किती कालावधी पर्यन्त हस्तांतरण करता येत नाही ?
- एकदा निर्णय घेऊन समजा अमल बजावनी झाली की तीन वर्षा पर्यन्त सदर घर पुन्हा हस्तांतर करता येत नाही.
प्रश्न - इन्कमटॅक्स रिटर्न मुदतीत भरण्यापर्यन्त नवीन खरेदी किंवा बांधकाम न झाल्यास सदर पैसे सेविंग खात्यात ठेवले तर चालतात का ?
- नाही, तसे चालणार नाही. सदर पैसे राष्ट्रीय कृत बँकेच्या कॅपीटल गेन अकाउंट स्कीम मध्ये ठेवणे बंधनकारक आहे.

आपण कॅपीटल गेन स्कीमची नवीन माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.