Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स ११

सध्या आपण कॅपीटल गेन टॅक्स मध्ये सुट मिळण्यासाठी काय काय करावे, याचा उहापोह करीत आहोत. म्हण्जे सोप्या भाषेत यालाच असे म्हणता येईल की जर आपली प्रॉपर्टी विकली तर त्या वर एक तर इन्कमटॅक्स लागु नये किंवा टॅक्स एकदम कमी लागावे, यासाठी आपण काय केले पाहीजे, हे बघत आहोत. आज आपण याचा गोषवारा बघणार आहोत.

प्रश्न - कलम 54 ची सुट मिळण्यासाठी महत्वाची अट काय आहेत ? 

- या कलमाखाली सुट मिळण्यासाठी महत्वाची अट अशी आहे की घर विकून आलेल्या पैशातुन नवीन घर घेतले पाहीजे म्हण्जे ट्रान्सफर ऑफ रेसीडन्सीयल हाउस झाले पाहीजे.

प्रश्न - ही सुट इन्कमटॅक्स कायद्यानुसार कोणाला मिळेल ? 

- ही सुट व्यक्ती किंवा एच. यु. एफ. यांना मिळते.

प्रश्न - ही सुट मिळण्यासाठी किती कालावधी पर्यन्त प्रॉपर्टी विक्रेत्याकडे असली पाहीजे ? म्हण्जेच याचे होल्डींग पीरीयड किती पाहीजे ? 

- या साठी होल्डींग पीरीयड 36 महिने पाहीजे. नवीन कायद्यानुसार 24 महिने असले तरी चालेल. याचाच अर्थ असा की मालमता किंवा प्रॉपर्टी ही लॉंग टर्म कॅपीटल असेट असावी म्हण्जे दीर्घ कालीन मालमता असावी.

प्रश्न - या कलमात सुट मिळण्यासाठी किती रकम असावी ?

- यात दोन बाबी असु शकतात. एक तर कॅपीटल गेन इन्वेस्टमेंट पेक्षा जास्त आहे किंवा दुसरीबाब कॅपीटल गेन इन्वेस्टमेंट पेक्षा कमी आहे. जर कॅपीटल गेन इन्वेस्टमेंट पेक्षा कमी असेल तर पूर्ण इन्वेस्टमेंट केलेल्या पैशाची वजावट मिळेल . जर दुसरीबाब असेल कि कॅपीटल गेन हें इन्वेस्टमेंट पेक्षा जास्त असेल तर जितके पैसे इन्वेस्टमेंट मध्ये कमी केले त्या फरकावर इन्कमटॅक्स म्हण्जे कॅपीटल गेन टॅक्स लागेल.

प्रश्न - या वरील दोन बाबी उदाहरणासह सोप्या भाषेत कसे सांगाल ? 

- उदाहरणार्थ जर कॅपीटल गेन 20 लाख आहे तथा इन्वेस्टमेंट 30 लाख म्हण्जे जास्त आहे तर पूर्व 20 लाखावर सुट मिळेल. परंतु हेच जर कॅपीटल गेन 20 लाख आहे तथा इन्वेस्टमेंट 10 लाख आहे तर अर्ध्या पैशावरच सुट मिळेल.

आज आपण कलम ५४ ची सुट मिळण्यासाठी काय अट आहे, त्याचे स्वरूप म्हण्जे नेचर काय ? कोणाला सुट मिळते ? मालमता हस्तांतरित व्हायच्या आधी होल्डींग पीरीयड काय ? किती रुपयांपर्यंत सुट मिळते हे बघीतले. पुढच्या आठवड्यात आपण ही इन्कमटॅक्सची सुट मिळण्यासाठी काय अटी आहेत ? जर डिपॉजिट वापरण्यात आल्या नाही तर काय परिणाम होतात ? इतर परिणाम करदात्यावर काय होतील ? रिटर्न भरायच्या आधी पर्यन्त पैसे कुठे ठेवावेत ? इत्यादी बाबतचे उहापोह बघणार आहोत, जे व्यवहारत उपयोगी ठरावे.