Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स १०

सर्वात आधी नेहमी प्रमाणे वाचकांचे प्रश्नोत्तर सर्वांच्या लाभासाठी येथे देत आहोत.

प्रश्न - मी माझ्या मुलाबरोबर लोन मध्ये सह-अर्जदार (Co applicant) आहे. माझ्या मुलाने पुण्यात फ्लॅट विकत घेतले आहे. लोन माझ्या पगारातुन वसुल केले जात आहे. आमच्या नावाने प्रॉपर्टी मॉर्टगेज आहे. मला इन्कमटॅक्स वजावट मिळेल का ?
- तुमच्या व मुलाच्या दोघांच्या नावाने लोन आहे. वसुली सुद्धा दोघांकडुन होणार आहे. प्रॉपर्टी दोघांच्या नावाने गहाण आहे. सर्व काही वस्तुस्थिती तथा Fact वर अवलंबुन असते. सध्याच्या तुमच्या प्रश्नावरून तुम्हाला इन्कमटॅक्स मध्ये तुमच्या हिश्याची सुट मिळण्यास हरकत नाही, असे दिसते.

सध्या आपण इन्कमटॅक्स मध्ये कॅपीटल गेन्स टॅक्स बद्दल बघत आहोत. सध्या आपण कलम 54 द्वारे मिळण्याच्या सुट बद्दल बघत आहोत.

प्रश्न - नटराजन यांनी एक घर त्यांची पत्नीच्या नावावर खरेदी केले. रामराव यांना इन्कमटॅक्स मध्ये कॅपीटल गेन्सची सुट मिळेल का ?  - या उदाहरणात नटराजन यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने घर खरेदी केले. त्या घराचे उत्पन्न नटराजन यांच्या नावाने येत होते व ते त्याच्यावर इन्कमटॅक्स हि भरत होते. मद्रास हायकोर्टने निर्णय दिले की त्यांना कलम 54 ची सुट देण्यात यावी. इन्कमटॅक्स ऑफीसरचे म्हणणे मद्रास हायकोर्टने रद्द बातला केले. सदरील केस कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स विरुद्ध नटराजन यांचे असुन वरील निर्णय मद्रास हायकोर्टने दिले आहे.

प्रश्न- मिस्टर विजय राठी यांनी एक घर विकुन दुसऱ्या घराचे बांधकाम केले. परंतु कायद्यात दिलेल्या मुदतीत नवीन घर बांधणे झाले नाही. इन्कमटॅक्स ऑफीसरने सुट देण्याचे नाकारले. आता विजय राठी यांनी काय करावे ? - सदर प्रकरण सरदारमल कोठारी विरुद्ध कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स सारखे असुन मद्रास हायकोर्टाने या केस मध्ये बांधकाम पूर्ण झाले नसताना ही कोठारी यांना प्लॉट घेऊन पूर्ण रक्कम बांधकामासाठीच वापरली. परंतु घराला पुन्हा जास्तीची रक्कम नंतर ही लावण्यात आली. कोर्टाने निर्णय दिले की राहत्या घरासाठी पुर्ण रक्कम वापरली म्हणून सुट देण्यास काहीच हरकत नाही. कोर्टाने पुन्हा पुष्टी जोडली की दिलेल्या तीन वर्षाच्या मुदतीत सर्व पैसे गुंतवले गेले पाहीजे हे जरी खरे असले तरी तीन वर्षातच घराचे बांधकाम पुर्ण झालेच पाहीजे, असे काही नाही. या आधारे विजय राठी यांना सुट मिळण्यास काहीच हरकत नाही. इन्कमटॅक्सची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.