आपण मागील काही आठवड्यापासून पॅन बद्दल बघत आहोत. आज आपण बघणार आहोत की अर्जदारास कायद्याप्रमाणे पॅन नंबर किती दिवसात मिळायला पाहिजे ? व्यवहारात मिळतो का ? न मिळाल्यास अर्जदारास पर्यायी व्यवस्था आहे का ? असल्यास कोणती ? एन.एस.डी.एल किंवा यु.टी आय पॅन कशाला म्हणतात. यांचे अधिकार काय ? सी.बी.डी.टी. म्हणजे काय ? अशा अनेक पॅन संदर्भात छोट्या मोठ्या विषयाबद्दल जे व्यवहारात अत्यंत उपयोगी आहे. या बद्दल सविस्तर माहिती प्रश्नोत्तर रुपात परंतु सोप्या भाषेत बघणार आहोत.
प्रश्न – पॅन नंबर करदात्यास कायद्याप्रमाणे किती दिवसात मिळायला पाहिजे ?
प्रश्न – पॅन नंबर करदात्यास कायद्याप्रमाणे किती दिवसात मिळायला पाहिजे ?
- सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आणि NSDL, UTI – ISL यांचे कराराप्रमाणे पॅन नंबर करदात्यास पंधरा दिवसाच्या आत मिळावयास पाहिजे. व्यवहारात मात्र पंधरा दिवसाच्या आत पॅन नंबर करदात्यास मिळत नाही.
प्रश्न – पंधरा दिवसात पॅन नंबर व्यवहारात मिळत नाही आणि पॅन नंबर अर्जदारास आवश्यकअसेल तर अर्जदाराने काय करावे ?
प्रश्न – पंधरा दिवसात पॅन नंबर व्यवहारात मिळत नाही आणि पॅन नंबर अर्जदारास आवश्यकअसेल तर अर्जदाराने काय करावे ?
- या साठी असे प्रावधानाची व्यवस्था केलेली आहे की जर अर्जदारास पॅन नंबर मिळाला नाही मात्र अर्जदाराने पॅन चा अर्ज करून ठेवला आहे. तर अर्जाची मुळ कॉपी किंवा त्याची प्रमाणित प्रत हि पॅन नंबर मिळे पर्यन्त पर्याय म्हणून जोडले तर टेम्पररी प्रमाणात चालू शकेल. मात्र दीर्घ काळात पॅन नंबर मिळणे आवश्यक आहे.
प्रश्न – एन.एस.डी.एल. किंवा यु.टी.आय. – आय.एस.एल म्हणजे काय आहे ?
प्रश्न – एन.एस.डी.एल. किंवा यु.टी.आय. – आय.एस.एल म्हणजे काय आहे ?
- सी.बी.डी.टी. यांनी एन.एस.डी.एल. किंवा यु.टी.आय यांना भारतात पॅनचे काम करण्यासाठी एजंट म्हणून नियुक्ती केलेली आहे. भारतातील दिलेल्या कायद्याच्या चौकटीतबसून सर्व अर्जदारांना पॅन नंबर देणे हे या एजन्सीचे निर्धारित काम आहे.
प्रश्न – सी.बी.डी.टी. म्हणजे नेमके काय ?
प्रश्न – सी.बी.डी.टी. म्हणजे नेमके काय ?
- सी.बी.डी.टी. चे फुल फार्म सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सस् आहे. सोप्या भाषेत असे म्हणता येईल की हि इन्कमटॅक्सची भारताची सर्वोच्च बॉडी आहे. भारताचे इन्कमटॅक्सचे सर्व व्यवहाराचे कायदे यांच्या व्दारे निर्देशीत केले जातात. या बॉडी मध्ये भारताचे सर्वोच्च अधिकाऱ्यांचा समावेश होतो. पॅनची इन्कमटॅक्सची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.